Tuesday, March 25, 2025
HomeनगरLahu Kanade Shrirampur : श्रीरामपुरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! लहू कानडेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...

Lahu Kanade Shrirampur : श्रीरामपुरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! लहू कानडेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

श्रीरामपूर । प्रतिनिधी

काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले विद्यमान आमदार लहू कानडेंनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

- Advertisement -

आमदार कानडे यांनी प्रदेशाध्यक्ष खा सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत हातात घड्याळ घेतले आहे. दरम्यान आमदार कानडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने शिवसेना शिंदे गटाची गोची झाली आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. तिथं विद्यमान आमदार काँग्रेस (Congress) होता. आमदार लहू कानडे यांचे काँग्रेसने तिकीट कापले. त्यांच्याऐवजी युवा नेते हेमंत ओगले यांना तिकीट देण्यात आले.

तेव्हापासून आमदार लहू कानडे चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी मुंबईत तळ ठोकून महायुतीकडे चाचपणी सुरू केली. या चाचपणीला स्थानिक संस्थानिक नेत्यांचे देखील बळ मिळत गेले. त्यामुळे आमदार कानडे महायुतीच्या गळाला लागले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...