Saturday, May 18, 2024
Homeनगरमाझ्यावरील आरोप पुराव्यानिशी सिध्द करावेत अन्यथा सभापतीपदाचा राजीनामा द्यावा

माझ्यावरील आरोप पुराव्यानिशी सिध्द करावेत अन्यथा सभापतीपदाचा राजीनामा द्यावा

बेलापूर |वार्ताहर| Belapur

ज्यांना जनतेने तीन वेळा नाकारले त्यांना आमच्यावर टिका करण्याचा अधिकार नाही. ज्यांना जेथे जाऊ तेथे खाऊ अशी सवय आहे त्यांना सगळेच आपल्यासारखे आहेत असे वाटते. अशी सवय असलेल्या सभापती सुधीर नवले यांनी मी ग्रामपंचायतीत मलई खातो हे पुराव्यानिशी सिध्द करावे आपण राजकीय संन्यास घेवू अन्यथा सुधीर नवलेंनी सभापती पदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिले आहे.

- Advertisement -

सभापती सुधीर नवले यांचे आरोप फेटाळताना श्री.खंडागळे यांनी जोरदार समाचार घेतला. आपण दोन वेळा ग्रामपंचायत, एकदा जिल्हा परिषदेला उभे होता. तुम्हाला तिन्ही वेळा जनतेने नाकारले. आपण गेली दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य नसताना कारभारात ढवळाढवळ करीत होता. आपल्या मनमानी व हुकूमशाही कारभारामुळे तत्कालीन ग्रामसेवकांना निलंबित व्हावे लागले तर सरपंचांना कारवाईला सामोरे जावे लागले. करोना काळात आपण शेतकरी, नागरिक, व्यापारी यांना दिलेला त्रास अजूनही लोक विसरलेले नाही. आपला कारभार स्वच्छ व चांगला होता तर जनतेने तुम्हांला नाकारुन गावकरी मंडळाकडे कारभार का सोपविला? याचे उत्तर श्री.नवलेंनी द्यावे. स्वतः सारखेच सगळे मलिदा लाटू आहेत असा त्यांचा समज आहे. आपण गावकर्‍यांशी प्रामाणिक असून रात्रंदिवस सर्वसामान्य जनतेची कामे करतो. ते ग्रामपंचायत, सोसायटी, अशोक कारखाना, मार्केट कमिटीच्या निवडणुकांतून आपण सिध्द केले आहे हिच श्री.नवलेंची खरी पोटदुखी आहे.

पदासाठी आपण अंधारात व गुपचूप कोणाचेही पाय धरले नाहीत. नवले हे सभापती पदासाठी कोणा कोणाकडे गेले हे सर्वांना माहीत आहे. आपल्या नातेवाईकांना घेऊन लोणी व विळद घाटात कोण गेले होते याचाही खुलासा व्हावा. ईश्वर चिठ्ठीवर सभापती झालेल्या श्री.नवलेंनी हवेत राहू नये. सन 1999 मध्ये माजी आ.भानुदास मुरकुटे यांचा प्रचार केला आणि निवडणूक निकालानंतर माजी आ.स्व.ससाणे यांना हार घालायला प्रवरेच्या पुलावर पळत गेले याला गाव साक्षी आहे. त्यामुळे त्यांनी नेत्यांवरील निष्ठा आम्हांला शिकवू नये. आपली माजी आ.मुरकुटे यांच्याबद्दल किती आस्था आहे हे सगळ्यांना माहीत आहे. मी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेतृत्व स्विकारले आहे. आणि विखे पाटलांनी देखील बेलापूर गावाला भरभरून देण्याचे काम केले आहे.

बेलापूर ग्रामपंचायत मधील आमचा कारभार पारदर्शी आहे. जे असेल ते ग्रामसभेत उघडपणे सांगत असतो. आपण कामे करतो तेव्हा पक्ष, गट-तट बघत नाही. आपण समस्या सोडवतो म्हणून लोक माझ्याकडे येतात. त्याबद्दल नवलेंना आसूया का? लोक आपल्याकडे का येत नाहीत व का नाकारतात? याचे आत्मपरिक्षण करावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या