Thursday, January 29, 2026
HomeनगरAccident News : ट्रक व दुचाकीच्या अपघातात बेलापूरच्या युवकाचा मृत्यू

Accident News : ट्रक व दुचाकीच्या अपघातात बेलापूरच्या युवकाचा मृत्यू

श्रीरामपूर रेल्वे उड्डाण पुलावरील घटना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर-नेवासा रोडवरील (Shrirampur Newasa Road) रेल्वे उड्डाण पुलावर आज (गुरूवारी) सकाळी दहा वाजेच्या सुमारास ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात (Truck and Bike Accident) होऊन यात बेलापूर येथील 18 वर्षीय युवकाचा मृत्यू (Death) झाला. कार्तिक भंडारी असे मृत युवकाचे नाव आहे.

- Advertisement -

आज (गुरूवारी) सकाळी दहा वाजेच्या सुमारास कार्तिक भंडारी हा त्याच्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून परिक्षेसाठी जात असताना रेल्वे उड्डाण पुलावर ट्रक व त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात कार्तिक जखमी झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी या अपघाताची (Accident) माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला (Shrirampur City Police Station) दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कार्तिकला उपचारासाठी येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले.

YouTube video player

मात्र, कार्तिक गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी लोणी प्रवरा येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान कार्तिकचा मृत्यू झाला. दरम्यान, याच ठिकाणी काही दिवसापूर्वी एका महिलेचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू (Death) झाला होता. तरी प्रशासनाने दखल घेऊन रेल्वे उड्डाण पुलावर ये-जा करताना दोन स्वतंत्र रस्त्याची निर्मिती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समितींच्या निवडणुकीच्या तारखेत मोठा...

0
मुंबई | प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदान...