Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूर पंचायत समितीतून चार संगणकांची चोरी

श्रीरामपूर पंचायत समितीतून चार संगणकांची चोरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर पंचायत समितीच्या कार्यालयातील बंद विभागाच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून 4 संगणक व एक पंचींग मशिन असा सुमारे 72 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी पंचायत समितीचे दत्तात्रय पणीलाल साळुंके यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोमवार दि. 17 जुलै 2023 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयाच्या एका विभागाच्या रूमच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला.

कार्यालयातील 25 हजार रुपये किमतीचे लिनिओ कंपनीचे ऑल इन वन नवीन 2 संगणक, 10 हजार रुपये किमतीचे 1 संगणक, 11 हजार रुपये किमतीचे संगणक, सिपीयू एसइडी, 10 हजार रुपये किमतीचे पंचींग मशिन असा एकूण 72 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरनं 724/2023 भादंवि कलम 380, 457 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. खेडकर करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या