Tuesday, March 25, 2025
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेत्याने काढली शिक्षकांची लाज

श्रीरामपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेत्याने काढली शिक्षकांची लाज

प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमातील घटनेचा निषेध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

प्रजासत्ताक दिन तालुक्यात सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. परंतु एका संयुक्तीक प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित एका ज्येष्ठ नेत्याने चक्क शिक्षक-शिक्षिकांच्या लाजा काढल्या. त्यांना एका आरोपीप्रमाणे पालक व विद्यार्थ्यांसमोर रांगेत उभे करून शिवराळ भाषेत खडेबोल सुनावले. घडलेल्या प्रकाराचा शिक्षकांनी बैठक घेऊन निषेध केला आहे. तालुक्यात या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

तालुक्याच्या पूवर भागात प्रजासत्ताक दिनी आयोजित एका संयुक्तीक ध्वजारोहण कार्यक्रमात झालेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचीच प्रतिमा मलीन झाली आहे. लोकनेत्याच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात होते. विद्यार्थ्यांचे नृत्यसादरीकरण अपेक्षेप्रमाणे झाले नाही, याचा राग येऊन या ज्येष्ठ नेत्याने जिल्हा परिषदेचे शिक्षक व रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक यांना जबाबदार धरत सार्वजनिकरित्या त्यांच्यावर अपमानजनक भाषेत लाखोली वाहून भर कार्यक्रमात शिक्षकांचा अपमान केला. तसेच अर्वाच्च भाषेत टिप्पणी केली. याठिकाणी उपस्थित पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांसमोर या ज्येष्ठ नेत्याने शिक्षकांच्या लाजा काढल्या.

त्यामुळे शिक्षक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. या ज्येष्ठ नेत्याने महिला शिक्षकांना व्यासपीठासमोर बोलावून घेतल्यानंतर कॉलेजमधील टारगट मुलांनी शिट्ट्या वाजवल्याने संबंधित महिला शिक्षिकांनाही त्याचा मानसिक धक्का बसला आहे. शाळेच्या आदर्श महिला शिक्षकांना कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थी व पालकांसमोर अगदी आरोपीसारखे बोलावून घेऊन सार्वजनिकरित्या अपमानास्पद शब्दात बोलून त्यांच्या पगारा सोबतच त्यांच्या लाजाही काढल्या. घडलेला हा प्रकार अतिशय निंदनिय असून या घटनेबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत कुणीही तक्रार करु नये यासाठी या शाळेतील शिक्षकांवर वरिष्ष्ठ पातळीवरुन दबावतंत्र सुरु झाले आहे. नोकरी टिकवायची म्हणून हे शिक्षक दडपणाखाली असून जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी यात लक्ष घालून संबधितांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही होत आहे.

शिक्षकांचा आत्मसन्मान धोक्यात
शिक्षण क्षेत्र हे समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. महिला शिक्षकांचा अपमान करत असताना तेथील कॉलेजच्या विद्यार्थांनी शिट्ट्या वाजविल्या, ही बाब गलिच्छ स्वरूपाची आहे, या ज्येष्ठ नेत्याने केलेल्या गैरवर्तणूकीने शिक्षकांचा आत्मसन्मान धोक्यात येतो. या प्रकाराची सामाजिक संघटना आणि महिला हक्क आयोगाने दखल घेणे आवश्यक आहे.
– श्रीकृष्ण बडाख, अध्यक्ष अहमदनगर जिल्हा विद्यार्थी पालक संघ

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...