Friday, November 22, 2024
Homeनगरश्रीरामपूर शहरसह तालुक्यात जोरदार पाऊस

श्रीरामपूर शहरसह तालुक्यात जोरदार पाऊस

खरीपाच्या तयारीला वेग येणार || बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राज्यामध्ये मान्सून दाखल होताच आज (रविवारी) श्रीरामपुर (Shrirampur) शहरासह तालुक्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस (Rain) झाला. त्यामुळे शेतीच्या कामाला वेग येणार असून चारा पिकांना (Crops) जीवदान मिळाले आहे. तसेच शहरातील रस्ते जलमय झाले होते. उन्हाच्या उकड्यापासून हैराण झालेल्या श्रीरामपूरकरांना या पावसाने दिलासा मिळाला. रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. सुमारे दोन तास चाललेल्या या पावसाने शहरातील सखोल भागात पाणी साचले होते. मान्सून दाखल (Monsoon) होण्यापूर्वी तालुक्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेने अनेकांची लाहीलाही झाली होती. मात्र दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार होत जोरदार पावसाला सुरुवात झाली. धो-धो सुरु असलेल्या पावसाने संपुर्ण शहर तसेच तालुक्याला झोडपून काढले.

- Advertisement -

या पावसाने तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. या पावसामुळे तालुक्यात खरीप पेरणीपूर्व (Kharif) मशागतीच्या कामास वेग येणार आहे. नांगरणी, वखरणी, खत पसरविणे आदी कामांबरोबरच बी-बियाणे, खते खरेदीसाठी आर्थिक जुळवाजुळव शेतकर्‍यांकडून सुरू आहे. यासाठी कृषी विभागानेही तयारी पुर्ण केली असून यंदा 26 हजार 300 हेक्टर क्षेत्राचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. तालुक्यातील गुजरवाडी, खिर्डी, वांगी, कारेगाव, मातापूर, मालुंजा, बेलापूर, पढेगाव, खंडाळा आदी भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. तर शहरात पहिल्याच पावसाने रस्त्यावर पाणीचपाणी साचले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या