Tuesday, October 22, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

श्रीरामपूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

परतीच्या पावसाने (Rain) तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने सोयाबीन (Soybeans), मका (Corn), कांदा रोप (Onion) यासह वेचणीला आलेला कापूस (Cotton) भिजून वाती झाल्याने शेतकरी अर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. तालुक्यातील खंडाळा 65 मिमी, श्रीरामपूर (Shrirampur) 37 मिमी, वडाळा 16 मिमी, तर कारेगाव परिमंडळात 74 मिमी इतका पाऊस पडला आहे. या पावसाने कापूस उत्पादकांची दाणादाण उडवून दिली असून वेचणीस आलेल्या कापसाचे (Cotton) मोठे नुकसान झाले आहे. शेतीमध्ये पाणीच पाणी झाले असून यामुळे रब्बी हंगाम (Rabbi Season) लांबणीवर पडणार आहे.

- Advertisement -

खरीपाच्या पेरणानंतर जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर ऑगस्टपासून सतत पावसाने हजेरी लावली. पिके जोमात असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहेत. मात्र, शनिवारी दुपारी व त्या पाठोपाठ रात्रीही जोरदार अतिवृष्टी झाली. परतीच्या पावसाने दिलेल्या या तडाक्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात सर्वच भागात कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला. काही ठिकाणीही सोंगून शेतात पडलेली सोयाबीन (Soybeans) पाण्यात भिजून गेली आहे.

मक्याच्या कणसाला कोंब फुटले आहेत. तर कांदा (Onion) रोप साडण्याच्या मार्गावर आहे. यात सर्वात अधिक फटका बसला तो कापूस उत्पादकांना. वेचणीला आलेला कापूस (Cotton) भिजला असून त्याच्या वती झाल्या आहेत. तर काही कापूस हा पावसामुळे जमीनीवर पडल्यामुळे चिखलमय झाला आहे. या भिजलेल्या कापसाला 5 हजार 500 रुपयांच्या पुढे भाव मिळेना. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सणासुदीच्या काळात परतीच्या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या