Tuesday, May 7, 2024
Homeनगरश्रीरामपुरात 11 ऑक्टोबरला पाणी परिषद

श्रीरामपुरात 11 ऑक्टोबरला पाणी परिषद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी मंगल कार्यालयात दि. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्यावतीने पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisement -

श्रीरामपुरातील शासकीय विश्रामगृहात शेतकरी संघटनेची बैठक पार पडली. त्यावेळी याबाबत नियोजन करण्यात आले. यावेळी जायकवाडीला पाणी जाण्याबाबत सर्वांनी तीव्र मते मांडली. जायकवाडीला पाणी गेल्यानंतर वाड्या वस्त्यांवर प्यायला पाणी राहणार नाही तसेच भंडारदरा लाभक्षेत्रातील जनतेचा जीवन मरणाचा प्रश्न तयार होऊ शकतो या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पाणी परिषद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली.

भंडारदरा व दारणा धरणाचे लाभक्षेत्र हे 100 वर्षांपासून बारमाही पिक पध्दतीचे असताना तेथे 4 ते 5 सिंचन आवर्तनात शेतकरी शेती करतात. मुळा धरणाचे जेमतेम 3 आवर्तने होतात तरीही तेथील शेतकरी शेती करतात. परंतु जायकवाडी लाभक्षेत्रात अशी कुठली शेती पिकवली जाते की त्यांना 7-8 आवर्तने लागतात. केवळ कायदा आपल्या बाजूने आहे पाणी येऊ शकते म्हणून जायकवाडीच्या लाभक्षेत्रात पाण्याची उधळपट्टी होत असल्याचा आरोप भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे अध्यक्ष सुरेश ताके यांनी करुन या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायपत्राचा सन्मान करुन पाणी थांबवण्यासाठी ही पाणी परिषद महत्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दि. 10 ऑक्टोबरला निळवंडे लाभक्षेत्रासाठी आवर्तन सुटणार आहे. त्यामुळे भंडारदरा लाभक्षेत्रात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवणार असल्याने पाणी परिषद घेऊन लाभक्षेत्रासाठी काही महत्त्वाचे ठराव करणे गरजेचे असल्याचे पाणी परिषदेचे स्वागताध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सांगितले.

बैठकीस सेवानिवृत्त पाटबंधारे अधिकारी सुभाष फरगडे, कृष्णा शिंदे, अ‍ॅड. विजय साळुंके, भागचंद औताडे, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, व्यापारी असोसिएशन पुरुषोत्तम झंवर, शिवसेनेचे संजय छल्लारे, चेतन औताडे, निलेश शेडगे, शांतीलाल हिरण, प्रशांत लढ्ढा, अभिजित लिप्टे, बापूसाहेब शेरकर, युवराज जगताप, नितीन पटारे, सुभाष त्रिभुवन, किशोर पाटील, कैलास बोर्डे, भरत आसने, रामचंद्र पटारे, दत्तात्रय लिप्टे, संदिप गवारे, नामदेव येवले, राजेंद्र भांड, ईश्वर दरंदले, हरिभाऊ तुवर, गोविंदराव वाघ, अशोकराव टेकाळे, सचिन साठे शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या