Monday, May 27, 2024
Homeनगरश्रीरामपुरात तरुणाची आत्महत्या

श्रीरामपुरात तरुणाची आत्महत्या

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील वॉर्ड नं. 1 परिसरातील इशांत संजय जनवेजा या 19 वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. इशांत याने गळफास घेतल्याचे समजताच त्याच्या घरच्यांनी त्याला उपचारासाठी तातडीने साखर कामगार रूग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

तेथील डॉक्टरांनी इशांतला तपासले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. साखर कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना याबाबत खबर दिली. त्यावरून श्रीरामपूर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इशांतने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या