Tuesday, January 6, 2026
Homeनाशिकपर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची : सुरक्षित नाशिकला प्राधान्य - पोलीस आयुक्त संदीप...

पर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची : सुरक्षित नाशिकला प्राधान्य – पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

नाशिक | Nashik

सिंहस्थात नाशिककरांसह (Nashik) देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी हायटेक व स्मार्ट पोलिसिंगसह ‘एआय’ आधारित प्रणालीचा अवलंब प्राधान्याने करण्यात येईल. त्यासोबतच रस्त्यांवरील गुन्हे (स्ट्रीट क्राईम) नियंत्रणासह महिला, सामाजिक सुरक्षा व नागरिककेंद्रित पोलिसिंगवर भर देऊन ‘सुरक्षित नाशिक’ला प्रथम प्राधान्य असेल. सिंहस्थात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व नियोजनाकरता आयुक्तालयात स्वतंत्र ‘सिंहस्थ सेल’ सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -

आगामी सिंहस्थ डोळ्यांसमोर ठेऊन नाशिक महानगर पोलिसांचे (Nashik City Police) काटेकोर नियोजन पूर्णत्वास जात आहे, नाशिककरांसह देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी हायटेक व स्मार्ट पोलिसिंगसह ‘एआय आधारित प्रणालीचा अवलंब प्राधान्याने करण्यात येईल. त्यासोबतच रस्त्यांवरील गुन्हे (स्ट्रीट क्राईम) नियंत्रणासह महिला, सामाजिक सुरक्षा व नागरिककेंद्रित पोलिसिंगवर भर देऊन ‘सुरक्षित नाशिक’ला प्रथम प्राधान्य असेल, असे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी सांगितले. दैनिक ‘देशदूत’च्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘पर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची’ या संकल्पनेवर आधारित विशेषांकाच्या मुलाखतीदरम्यान आयुक्त संदीप कर्णिक यांनी सिंहस्थातील डिजिटल पोलिसिनसह महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केले.

YouTube video player

सिंहस्थामुळे नाशिक महानगर जागतिक पटलावर पुन्हा चर्चेत आले आहे. नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये २०२६-२७ या एक ते सव्वा वर्षाच्या कालावधीत सिंहस्थ विविध पर्वण्या पार पडणार आहेत. त्या संदर्भातील सूक्ष्म नियोजन, स्थानिक व बाहेरील अतिरिक्त बंदोबस्त, शहर वाहतूक, व्हीआयपी सुरक्षा, पेराफेरी एरिया, सामान्य भाविकांची व्यवस्था, अंतर्गत सुरक्षा तसेच गर्दी व्यवस्थापन (होल्ड अॅण्ड रिलिज), वाहनतळ, मार्ग, पोलीस मदत केंद्र आदी महत्वाच्या विषयांवर उच्चस्तरीय समिती तसेच स्थानिक प्रशासन समन्वयाने निर्णय घेत आहे. त्यादृष्टीने बहुतांश कामे दृष्टिपथात आहेत. अशातच ‘प्रयागराज’ कुंभमेळ्याप्रमाणे नाशिकमध्ये १७ ते १८ किलोमीटरचे भव्य घाट नाहीत. अडीच ते तीन किलोमीटरचे घाट आहेत. त्यात तपोवन, रामकुंड व गोदाघाट ही तीन स्थळे महत्त्वाची आहेत. येथे मुख्य अमृत स्नान व पर्वणी पार पडेल. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेवर यंत्रणांचे बारीक लक्ष असेल. सिंहस्थात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व नियोजनाकरता आयु‌क्तालयात स्वतंत्र ‘सिंहस्थ सेल’ सुरू करण्यात आला आहे. तो अद्ययावत असून त्याचे ‘प्रभारी’ गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके (Sandeep Mitke) त्यादृष्टीने कार्यरत आहेत.

कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, बंदोबस्ताची आखणी, वाहनतळ, वाहनांचे मार्ग ठरवण्यासह व्हीआयपींचे दौरे, सीसीटीव्ही, गर्दी नियंत्रण आणि व्यवस्थापनासह इतर सर्व महत्त्वाच्या मुद्यांवरील कामकाजाचा आढावा वारंवार घेतला जात आहे. विशेष म्हणजे, शहर पोलिसांनी पूर्वतयारी समिती स्थापन करून सिंहस्थातील कामांच्या जबाबदारीचेही वाटप केले आहे. सिंहस्थ कालावधीत शहरातील साडेतीन हजार पोलीस अधिकारी कर्मचान्यांसह महाराष्ट्र व परराज्यातून २२ हजार पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ मागवण्यासह इतर आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रयागराज कुंभमेळ्याचा अभ्यास व पाहणी दौरादेखील पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि सेलने केला आहे. तेथील अंतिम सर्वेक्षणानुसार नाशिकमध्येही त्या स्वरुपाचे नियोजन अंमलात आणण्याचा मानस आहे. त्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सोबतच सायबर पोलिसिंग, तंत्रस्नेही पोलिसिंग, अद्ययावत वाहनांसह तंत्रज्ञानावर आधारित बंदोबस्ताच्या समावेशावर अधिकचा भर दिला जाईल. कारण शहर पोलिसांच्या हद्दीत सिंहस्थपर्वात एक कोटीहून अधिक भाविक येण्याचा यंत्रणांचा अंदाज आहे. त्यानुसारच पोलिसिंगचे नियोजन असून ‘अॅक्शन प्लॅन बी देखील तयार केला जात आहे. यासह पोलिसांच्या मदतीला एनएसएस, एनसीसीसह २०० महाविद्यालयांतील तब्बल दोन लाख विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून कार्यरत असतील. विशेष म्हणजे गर्दी व्यवस्थापन, स्नानघाटांसह गंगेवर आणि वाहनतळांवर हे विद्यार्थी स्वयंसेवकांच्या रूपाने मदत करतील. सोबतच शहर पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) समावेश असलेल्या सीसीटीव्हींतून लाखोंच्या गर्दीत बंदोबस्तावेळी अचूक माणसे हेरण्याच्या कामाची चाचपणी पूर्ण केली आहे. सध्या तज्ज्ञांकडून पोलीस ठाण्यांसह सर्व पथक्रांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे, बिनतारी संदेश यंत्रणेच्या ‘डिजिटलायझेशन’ करता युद्धपातळीवर काम सुरू आहे.

शहरासाठी कायमस्वरुपी पोलीस चौक्या व बेरेक्स उभारल्यावर त्याचा फायदा नाशिककला (Nashik) होईल यादृष्टीने प्रयत्न सरू आहे, असे आयुक्त कर्णिक यांनी सांगितले. दोन हजार ठिकाणी पाच हजार सीसीटीव्ही बसवण्यासोबतच एक हजार बॉडी कॅमेरे व वाहनांवरील १०० कॅमेऱ्यांची सोय कायदा व सुव्यवस्थेसाठी पूरक ठरू शकेल यादृष्टीने चाचपणी सुरू आहे. दरम्यान, शहर पोलिसांच्या ‘सुरक्षित नाशिक’ संकल्पनेसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट अॅथॉरिटीसह इतर काही संस्था हातभार लावत आहेत. नाशिकमधील सीसीटीव्हींचे जाळे घट्ट करण्यासाठी प्राधिकरणाने (जेएनपीए) ५० लाखांचा सीएसआर निधी दिला आहे. इतरही संस्थांनीही पुढाकार पुढाकार घेतला आहे. नाशिककरांना सीसीटीव्हीची आवश्यकता व गरज अधोरेखित करण्यासाठी आयुक्तालयाने सीसीटीव्ही एक्स्पोचे आयोजन करून जनजागृतीही केली आहे. त्याचा निश्चितच फायदा होत आहे. आतापर्यंत ३४० कॅमेरे मिळाले आहेत. सुजाण नाशिककरांनी आपापल्या आस्थापनांसह परिसरातही आत्ता १,२०० हुन अधिक सीसीटीव्हींचे खासगी जाळे निर्माण केले असून ही कौतुकाची बाब आहे. यामुळे अनेक गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यास मदत होत आहे. घडलेल्या गुन्ह्यांच्या डिटेक्शनसाठी त्याचा फायदा होत आहे. शहर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ‘स्ट्रीट क्राईम’ नियंत्रणासह महिला सुरक्षा व नागरिक केंद्रित पोलिसिंगवर नियमित लक्ष आहे. खून, खुनाचे प्रयत्न, जबरी चोऱ्या व गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची तातडीने उकल करण्याचे आदेश प्रभारींसह पथकांना आहेत. त्यानुसार स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखांसह विशेष पथके कार्यरत आहेत. त्यामुळे आयुक्तालयात गंभीर गुन्ह्यांचा ‘डिटेक्शन रेट’ शंभर टक्के आहे, असे कर्णिक म्हणाले.

‘व्हॉटसअॅप हेल्पलाईन’वर तक्रार किंवा सूचना प्राप्त होताच कारवाई होत असल्याने नागरिकांनाही सुरक्षित वाटत आहे. ‘शासक नव्हे, सेवक’ या संकल्पनेतून नाशिककरांच्या सुरक्षेसह तक्रारींना प्राधान्य दिले जात आहे. नागरिककेंद्रित पोलिसिंग संकल्पनेअंतर्गत आयुक्तालयामार्फत शरणपूररोडवरील झोन १ कार्यालय आवारात ‘कॉमन मॅन पोलीस’ असे अनोखे शिल्प साकारण्यात आले आहे. पोलीस आणि सामान्य नागरिकांमध्ये संवाद सेतू बळकट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते त्याचे अनावरण झाले. विशेष म्हणजे शिल्पाच्या दगडकामाचे कारागीर मोतीराम पवार यांच्यासह हवालदार विशाल पवार यांनाही अनावरणाचा मान देण्यात आला. सामाजिक बांधिलकीतून, पोलिसांमार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. १,३२५ जागांच्या भरतीतून ५१३ पैकी ४३१ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. ६३ पैकी ५१ पोलीस पाल्यांनाही नोकरी उपलब्ध झाली आहे. अवैध सावकारांविरुद्ध धाडसत्र निरंतर सुरू आहे. ‘वॉक इन टूर’ अंतर्गत विद्यार्थ्यांना आयुक्तालयातील कामकाजाची प्रत्यक्ष माहिती दिली जात आहे.

धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचे मनोबल वाहवले जात आहे. शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा व तितक्याच जिकिरीच्या असलेल्या द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन प्रयोग पोलीस आयुक्तालयाकडून राबवण्यात आला आहे. येथील वाहतूक नियोजनासाठी पोलीस निरीक्षकांसह ३१ अधिकारी व अंमलदारांचे स्वतंत्र पनक नियुक्त करण्यात आले आहे. नाशिक महानगर नशामुक्त असावे, यासाठी आयुक्तालयाच्या एनडीपीएस पथकाने कारवाईला धार दिली आहे. गेल्या अडीच वर्षात शहरातून सुमारे ११ कोटी ७६ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. या गुन्ह्यांच्या सविस्तर तपासासंदर्भात पथकाला सक्त सूचना आहेत. पथकाला सर्व संशयितांच्या सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण करून तस्करांची साखळी उघड करण्याचे आदेश दिले आहेत, गोवंश गुन्ह्यांशी संबंधित व इतर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या शहरातील २३७ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे, असे कर्णिक म्हणाले.

टवाळखोरांना प्रतिबंध करण्यासाठी आयुक्तालयाने कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या दीड वर्षात तब्बल ४२ हजार संशयित अर्थात गुन्हेगार व टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ‘डायल ११२’, बीटमार्शल, डीबी पथकांकडून चार मिनिटांत प्रतिसाद दिला जात आहे. ‘जीपीएस’ व ‘एआय’वर आधारित पोलिसांची गस्त तसेच ‘ग्राऊंड प्रेझेन्स अॅप’द्वारे ९०० पेक्षा जास्त ठिकाणांच्या नकाशामार्फत पोलिसिंगला मदत होत आहे. गुन्हेगारांचे वर्तन सुधारण्यासाठी तसेच त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीतून परावृत्त करण्यासाठी १,२९२ गुन्हेगार पोलिसांनी दत्तक घेतले आहेत. हेत. खुल्या जागेत मद्यप्राशन करणान्यांसह अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले जात आहेत. नाशिककर प्रवाशांना काही रिक्षाचालकांकडून असलेला त्रास, बेशिस्तपणा हेरून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. साधारण नऊ हजार चालकांवर विविध कलमांसह स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. हद्दीत पेट्रोलिंग करणाऱ्या दुचाकीवरील ‘दामिनी’नी आपल्या कार्याची चुणूक दाखवून मद्यपी, टवाळखोर व वाद घालणाऱ्या पाच हजारांहून अधिक संशयितांवर कारवाई केली आहे. यात ‘स्टॉप अॅण्ड सर्च’ कारवाईसह १,१२० निर्जन ठिकाणे, मोकळी मैदाने, कॉलनी व ओसाड जागा, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी ८६० वेळा भेटी दिल्या आहेत हे काम अविरत सुरू आहे. यासोबतच, ‘सीपी व्हॉटस्अॅप हेल्पलाईन’ चा हजारो नाशिककरांनी वापर केला आहे. प्रमुख्याने सायबर गुन्हे व त्यांसंबंधीच्या अनेक तक्रारी प्राप्म आहेत, त्याखालोखाल अवैध व्यवसाय व शहर वाहतुकीसंदर्भात तक्रारी होत्या. साधारणतः ४,४४९ तक्रारींपैकी ४,२५० तक्रारींचे निराकरण आयुक्तालयाने केले आहे. पोलीस दलाची प्रतिमा व शिस्त बिघडवणाऱ्या उपद्रवी पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. विभागीय चौकशीत दोषी आढळलेल्यांवर बडतर्फी व निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शहरात बॅनर व फ्लेक्सबाजी करून अप्रत्यक्षरीत्या दहशत माजवण्याचे प्रकार आयुक्तालयाने हेरून अशा गुंडांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असेही आयुक्तांनी नमूद केले.

आयुक्तालयाने आतापर्यंत १३ कोटी रुपयांचा मुद्देमाल अनेक फिर्यादींना परत केला आहे. त्यासोबतच, शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘एआय’ आधारित सिग्रलचे काम प्रगतिपथावर आहे. द्वारकासह २८ महत्त्वाच्या चीकांत ही यंत्रणा असेल. त्यामुळे ज्या बाजूला जास्त गर्दी असेल, त्या बाजूला सिग्ग्रलला जास्त वेळ मिळेल. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यास मदत्त होईल. नवे २७ सिाल्सही प्रस्तावित आहेत. शहरात सोनसाखळी ओरबाडून नेणाऱ्या सराईतांना चठणीवर आणण्यासाठी आयुक्तालयाने या चेनस्नॅचर्सवर पहिल्यांदाच ‘मोका’ कारवाईचे अस्त्र उपसले आहे. या कारवाईमुळे सराईतांना जरब बसून गंभीर गुन्द्यांचा आलेख कमीच होण्यास मदत मिळेल, यासह पोलीस आणि सामान्य नागरिकांतील सुसंवाद अधिकाधिक वाढावा आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी आयुक्तालयाने ‘पोलीस आयुक्त आपल्या दारी या संकल्पनेतून नागरिककेंद्रित पोलिसिंगबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा केली आहे. नागरिकांच्या प्रतिसादानुसार आवश्यक कार्यवाही आरंभल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे, असे आयुक्त कर्णिक यांनी स्पष्ट केले.

मुद्दे

  • भाविकांच्या सुरक्षेसाठी हायटेक व स्मार्ट पोलिसिंगसह ‘एआय’ अधारित प्रणालीचा अवलंब.
  • सिंहस्थ पर्वण्यांसाठी सूक्ष्म नियोजन, अतिरिक्त बंदोबस्त, शहर वाहतूक, व्हीआयपी सुरक्षा, गर्दी व्यवस्थापन, वाहनतळ आदी महत्त्वाच्या विषयांवर उच्चस्तरीय समिती
  • पोलिसांच्या मदतीला एनएसएस, एनसीसीसह २०० महाविद्यालयांतील दोन लाख विद्यार्थी स्वयंसेवक
  • दोन हजार ठिकाणी पाच हजार सीसीटीव्ही बसवण्यासोबतच त्या हजार बॉडी कॅमेरे व वाहनांवरील १०० कॅमेऱ्यााची सोय
  • द्वारका रार्कलवरील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन प्रयोग येथील वाहतूक नियोजनासाठी ३१ अधिकारी व अंमलदारांचे स्वतंत्र पथक

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...