Wednesday, February 4, 2026
HomeनगरShirdi : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिर्डी सज्ज

Shirdi : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिर्डी सज्ज

मुख्य सचिवांकडून कृती आराखड्याचे कौतूक

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

नाशिक येथे सन 2026-27 मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे येणार्‍या भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयार केलेला शिर्डी कृती आराखडा सर्वसमावेशक असल्याचा अभिप्राय मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिला आहे. भाविकांची सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि वाहतूक नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देत, या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी शिर्डी येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.

- Advertisement -

काल मंगळवारी झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सादरीकरणाद्वारे तयारीची सविस्तर माहिती दिली. नाशिक कुंभमेळ्यासाठी येणार्‍या एकूण भाविकांपैकी सुमारे 20 ते 25 टक्के भाविक शिर्डी व शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शहराबाहेर व मंदिरालगत सुमारे 94 हेक्टर क्षेत्रावर 8 नवीन पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली आहेत, जिथे स्मार्ट पार्किंग आणि शटल बस सेवा उपलब्ध असेल.

YouTube video player

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व अग्निशामक दलाच्या गाड्या अवघ्या 15-20 मिनिटांत घटनास्थळी पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत संवेदनशील ठिकाणांवर ड्रोन व सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाईल आणि विशेष प्रशिक्षित क्राउड मार्शल्स तैनात करण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधेच्या दृष्टीने श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व परिसरातील इतर रुग्णालये सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. कनेक्टिविटीच्या दृष्टीने शिर्डी विमानतळाची क्षमता वाढवून दररोज 20 उड्डाणांचे नियोजन तसेच देशभरातील 13 प्रमुख शहरांशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिककरिता 200, छत्रपती संभाजीनगर व पुण्यासाठी प्रत्येकी 40 जादा बसेसचे नियोजन आहे. शनिशिंगणापूर येथेही स्वतंत्र पार्किंग व दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या या सर्वंकष नियोजनाचे मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी कौतुक केले. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून भाविकांना सोयी-सुविधा देण्याचे काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी अधिकारी उपस्थित होते.

– शहराबाहेर व मंदिरालगत सुमारे 94 हेक्टर क्षेत्रावर 8 नवीन पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली आहेत, जिथे स्मार्ट पार्किंग आणि शटल बस सेवा उपलब्ध असेल
– संवेदनशील ठिकाणांवर ड्रोन व सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवणार
– शिर्डी विमानतळाची क्षमता वाढवून दररोज 20 उड्डाणांचे नियोजन
– नाशिककरिता 200, छत्रपती संभाजीनगर व पुण्यासाठी प्रत्येकी 40 जादा बसेसचे नियोजन
– शनिशिंगणापूर येथेही स्वतंत्र पार्किंग व दर्शन रांगेचे नियोजन

ताज्या बातम्या

ममता

SIR: “निवडणूक आयोग हे व्हॉट्सॲप आयोगासारखे, फक्त नावे हटवण्यासाठी…”, ममता बॅनर्जींचा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपश्चिम बंगालमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) खटल्याची बुधवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. या खटल्यावरून राजकीय...