Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Election 2024 : सिन्नर विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी तयारी पूर्ण

Maharashtra Assembly Election 2024 : सिन्नर विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी तयारी पूर्ण

सिन्नर । वार्ताहर Sinnar

सिन्नर विधानसभेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. येथील तहसील कार्यालयात शनिवारी (दि.23) सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी होणार असून, त्यासाठी 14 टेबल लावण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र भारदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र देशमुख यांनी दिली. दुपारी दोन वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे देखील वाचाMaharashtra Assembly Election 2024 : कळवण – सुरगाणा मतदार संघातील मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण

विधानसभा निवडणुकीत 12 उमेदवार उभे होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उदय सांगळे यांच्यातच चुरशीची लढत झाली. निकालाबाबत दोन्ही गटांकडून विजयाचे दावे केले जात असले तरी तालुक्यातील जनतेला याबाबत उत्सुकता लागून आहे.

हे देखील वाचा –संपादकीय : २२ नोव्हेंबर २०२४ – निरंतर लोकशिक्षण आवश्यक

टपाली मतदानाची मोजणी अगोदर होणार आहे. त्यासाठी 1 टेबल लावण्यात आला आहे. त्यानंतर 15 मिनिटांच्या अंतराने इव्हीएम यंत्रातील मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे. या प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 सहाय्यक, 1 सूक्ष्म निरीक्षक व 1 शिपाई अशा चौघांची नेमणूक करण्यात आलेली असून, प्रत्येक टेबलला उमेदवाराच्या एका मतमोजणी प्रतिनिधीला उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक फेरीचा निकाल निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे देखील वाचाप्रतिक्षा संपली! IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सुरुवात

स्ट्राँग रुमला त्रिस्तरीय सुरक्षा
इव्हीएम यंत्र ठेवण्याची व्यवस्था तहसील जवळच्या प्रशासकीय इमारतीत करण्यात आली आहे. इमारत व परिसरावर सीसीटीव्हीची निगराणी आहे. इमारतीला पहिल्या स्तरात केंद्रीय सशस्त्र दलाचे 30 जवानांचे 1 प्लाटून, दुसर्‍या स्तरात राज्य सशस्त्र दलाच्या जवानांचे 1 प्लाटून तर बाहेरील बाजूस महाराष्ट्र पोलिसांचे दोन अधिकारी व 8 अंमलदार तैनात करण्यात आलेे आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

मतमोजणीवर ड्रोनची नजर
मतमोजणी प्रक्रियेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून नागरिकांच्या हालचालींवर ड्रोनच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आणि याअगोदरही तालुकावासीयांनी सुसंकृत राजकारणाची परंपरा जोपासली आहे. ही परंपरा यापुढेही कायम ठेवावी. मतमोजणीतही या परंपरेला छेद जाऊ देऊ नये, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या