Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकSinnar : सारडा विद्यालयात उद्या रक्तदान शिबीराचे आयोजन

Sinnar : सारडा विद्यालयात उद्या रक्तदान शिबीराचे आयोजन

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाचे उदार देणगीदार वै. बस्तीरामजी नारायणदास सारडा यांच्या 59 व्या पुण्यतिथीनिमित्त उद्या (दि.19) सकाळी 9 वाजता नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर संकुलातील सर्व शाळा व ‘दै. देशदूत’ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य बाळासाहेब वाघ यांनी दिली.

- Advertisement -

‘नीलकमल’ बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत – मुख्यमंत्री फडणवीस

शिबीराचे ‘दै. देशदूत’चे कार्पोरेट विभागाचे व्यवस्थापक संदिप राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पंडित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या शिबीरात माहेश्वरी सुरभी मंडळ, माहेश्वरी युवक मंडळ, माहेश्वरी समाज, रोटरी क्लब ऑफ सिन्नर सिटी, रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर, साईकृपा सोशल फाऊंडेशन, लायन्स क्लब ऑफ सिन्नर, आर्ट ऑफ लिव्हींग, लघुउद्योग भारती, सिन्नर बार असोसिएशन, कुमुदिनी सोशल फाऊंडेशन, सिन्नर सायक्लिस्ट असोसिएशन, वनप्रस्थ व पाणी फाऊंडेशन, सिन्नर तालुका पुरोहित संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ढग्या डोंगर ट्रॅकर ग्रुप, नाईकवाडी फार्मसी कॉलेज या संस्थासह शाळेचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटविण्याची मागणी

वै. सारडा यांच्या पुण्यतिथी दिनी गेल्या 8 वर्षांपासून सारडा विद्यालयाच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. जनकल्याण रक्तपेढीच्या सहाय्याने हे शिबीर पार पडणार आहे.

शहरासह तालुक्यातील रक्तदात्यांनी या शिबीरात सहभागी होवून रक्तदान करावे असे आवाहन आयटीआयचे प्राचार्य शिवराज सोनवणे, संजीवनीच्या मुख्याध्यापिका करंबळेकर, माहेश्वरी युवक मंडळाचे पियुष लोया, अनिल असावा, जूगल लोया, राजेंद्र जाजू, संतोष मुटकुळे, सरदवाडीच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जेजूरकर, वरीष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य विनोद निरभवणे, राहूल मुळे, संदिप सरोदे, कांतीलाल राठोड यांनी केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...