Friday, November 22, 2024
Homeक्राईमNashik Sinnar News : भट्टी स्फोटप्रकरणी दोघांवर गुन्हा

Nashik Sinnar News : भट्टी स्फोटप्रकरणी दोघांवर गुन्हा

प्रकल्पप्रमुखासह दोघांवर निष्काळजीपणाचा ठपका

सिन्नर | वार्ताहर | Sinnar

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास कारखान्याच्या प्रकल्प प्रमुखासह अन्य एकावर भट्टीची काळजी न घेतल्याचा ठपका ठेवत निष्काळीपणा केल्याचा गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. कारखान्याचे सुपरवायझर मनोज वाढवणे यांनी ही तक्रार दिली. प्रकल्पप्रमुख रामचंद्र परशराम उणे (५९, रा.हिंदुस्तान ग्लास कारखाना, माळेगाव) व कोलकात्ता येथील नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल बेंचच्या आदेशान्वये रिसोल्युशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती असलेले गिरीश सिरीराम जुनेजा (६२, रा. २२ डिग्निटी अपार्टमेंट, अॅक्सीस बँक समोर, वर्सोवा, अंधेरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; पाहा कुणाचा समावेश?

कारखान्यात २९ डिसेंबर २३ रोजी रात्री ८ वाजता भट्टीचा स्फोट झाला होता. यात कंपनीलाही (Company) आग (Fire) लागली होती. आगीत कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली होती. फौजदारी न्यायलयामार्फत आलेल्या कागदपत्रांवरुन एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) हा गुन्हा दाखल केला आहे. दोघांवर कंपनीचे संरक्षण, जतन करण्याची जबाबदारी होती. कामगारांच्या सुरक्षिततेचे व हिताचे रक्षण करण्याच्या सूचना होत्या. दोघांनी संगनमत करुन भट्टीची देखभाल, दुरुस्ती व अग्नीशमन उपकरणे कार्यरत स्थितीत ठेवली नाहीत.

हे देखील वाचा : Nashik News : पहिल्या दिवशी ११८ अर्ज विक्री; इच्छुकांमध्ये उत्साह

दरम्यान, भट्टीच्या आयुर्मानाबाबत तपासणी एजन्सीकडून सूचना देवूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. निष्काळजीपणे कामकाज हाताळले. यात भट्टीचे तापमान १२४० डीग्रीपर्यंत नेल्याने भट्टीचा स्फोट झाला व कंपनीत आग पसरली. यात कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १७५ (३) अन्यवे गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी (Police) दोघांवरही ठकबाजी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या