Friday, May 3, 2024
Homeजळगावरक्षाबंधनाला सावत्रभाऊ न आल्याने बहिणीची आत्महत्या

रक्षाबंधनाला सावत्रभाऊ न आल्याने बहिणीची आत्महत्या

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

तालुक्यातील तमगव्हाण येथे एका १९ वर्षीय नव विवाहितने रक्षाबंधन सणाला सावत्र भाऊ घेण्यास न आल्यामुळे रागाच्या भरात विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना दि. ८ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या पूर्वी घडली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेखा दादाभाऊ पाटील रा. तमगव्हाण असे मयत विवाहितेच नाव आहे. सुरेखा हिचा विवाह सहा महिन्यापूर्वी झाला होता. तिचे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील माहेर आहे.

- Advertisement -

सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यामुळे सुरेखाला यंदा रक्षाबंधनासाठी माहेरी जाता आले नाही. भाऊ रक्षाबंधनासाठी घेण्यास आला नाही, याचा तिला राग होता. या रागातून तिने तमगव्हाण शिवारातील शेतातील विहीरीत उडी मारून आत्हत्या केल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

याप्रकरणी तमगव्हाण पोलीस पाटील केशवराव चुडामण पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ हे करीत आहेत.

दरम्यान मयत सुरेखाला आई-वडिल नव्हते, फक्त सावत्र भाऊ होते. तिचा विवाह सहा महिन्यापूर्वीच झाला, आणि कोरोनामुळे तिला गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी जाता आले नाही. त्यातच विवाहनतंरच्या पहिल्या रक्षाबंधनाच्या सणाला तिचा भाऊ देखील घेण्यासाठी आला नाही, याच विवचनेतून तिने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. प्राप्त माहितीनूसार सुरेखाचा भाऊ तिला भेटण्यासाठी दोन दिवसांपूर्वी येणार होता. परंतू वाट पाहून देखील तो न आल्याने तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या