Friday, April 25, 2025
HomeजळगावNashik Teacher Constituency Election 2024 : दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांकडून सहा अर्ज...

Nashik Teacher Constituency Election 2024 : दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांकडून सहा अर्ज दाखल

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teacher Constituency) उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी (Candidate) एकूण सहा अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत.

- Advertisement -

येत्या २६ जून रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Election) होत असून या निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला दिनांक ३१ मे पासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी दोन उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले होते. दरम्यान शनिवार व रविवार शासकीय सुट्टी असल्याने उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले नाही. त्यानंतर आज (दि.३) रोजी पुन्हा उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला.

हे देखील वाचा : Nashik Teacher Constituency Election 2024 : ‘टीडीएफ’चे राज्य कार्यकारणी सदस्य निशांत रंधेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

यानंतर दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी एकूण सहा अर्ज दाखल केले असून त्यामध्ये राजेंद्र विखे पाटील यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. तर निशांत विश्वासराव रंधे यांनी दोन अपक्ष तर एक भारतीय जनता पक्षाच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, या अर्जाला एबी फॉर्म जोडलेला नाही. त्याचप्रमाणे राजेंद्र दौलत निकम यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकूण आज तीन उमेदवारांनी सहा अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांची मुदत संपत असल्याने सदरची निवडणूक होत आहे. दराडे हे आता शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने अद्याप मात्र उमेदवार जाहीर केलेला नाही. त्याचप्रमाणे गेल्यावर्षी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या व पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...