Thursday, June 13, 2024
HomeनाशिकNashik Teacher Constituency Election 2024 : 'टीडीएफ'चे राज्य कार्यकारणी सदस्य निशांत रंधेंनी...

Nashik Teacher Constituency Election 2024 : ‘टीडीएफ’चे राज्य कार्यकारणी सदस्य निशांत रंधेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

मविआचे उमेदवार गुळवेंनाही 'टीडीएफ'चा पाठींबा, संघटनेत उभी फुट?

नाशिक | Nashik

- Advertisement -

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे बंधू राजेंद्र विखे (Rajendra Vikhe) यांचा समावेश आहे. मात्र, राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून अजूनही अधिकृतरित्या कुणीही अर्ज दाखल केलेला नाही. पंरतु, महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेकडून अ‍ॅड. संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

तसेच अ‍ॅड. संदीप गुळवे यांना शिक्षकांची सर्वात मोठी संघटना असलेल्या टीडीएफने नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा गुळवे यांनी केला आहे. मात्र अशातच आता नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला असून टीडीएफ संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य निशांत रंधे (Nishant Randhe) यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे टीडीएफमध्ये रंधेंच्या उमेदवारीने फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान, रंधे यांनी टीडीएफ संघटनेकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. मात्र, रंधेंना डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. तसेच धनशक्तीला उत्तर देण्यासाठी आपण ही उमेदवारी करत असल्याचे रंधे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता टीडीएफ संघटनेत फूट पडल्याने नाशिक लोकसभेप्रमाणेच नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुक चर्चेत आली आहे.

अ‍ॅड. संदीप गुळवे यांना ठाकरे गटाकडून एबी फॉर्म प्रदान

ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे तसेच खा. संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे अर्थात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अ‍ॅड. संदीप गुळवे यांना एबी फॉर्म प्रदान करण्यात आला आहे. तसेच मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अ‍ॅड. अनिल परब,मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ज. मो.अभ्यंकर यांनाही यावेळी ‘एबी फॉर्म’ देण्यात आला. त्यानंतर या सर्व उमेदवारांना उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या