पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील कुंभार गल्लीत (Potter’s Lane) रात्री 1 वाजेच्या सुमारास भिषण आगीत (terrible fire) सहा घरे जळून खाक (Six houses burnt down) झाली. त्यामुळे सहा कुटुंबांचा ऐन दिवाळीत संसार उघड्यावर आला. आगीचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत जिवीत हानी (no loss of life) झालेली नाही. नागरीकांच्या अथक प्रयत्नानंतर साडेतीन वाजता आग आटोक्यात (Fire under control) आली. या आगीत वीस लाख 43 हजार पाचशे रुपयाच नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. .
लक्ष्मीपूजनच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. रात्री 12 वाजेनंतर सर्व झोपी गेले. त्यानंतर रात्री एक वाजेच्या सुमारास कुंभार गल्लीत अचानक धुराचा व आगीचा डोंब दिसला. त्यामुळे परिसरात एकच धावपळ सुरु झाली. सरलाबाई रमेश बागुल या आपल्या मुलासह घरात झोपलेल्या होत्या. त्या लघुशंकेसाठी उठल्या तेव्हा त्यांना घराला आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे त्या आपल्या मुलाला घेऊन अंगणात पळाल्या व त्यांनी आरडा ओरडा सुरू केला. ऐन झोपीची वेळ असल्याने गाड झोपेत शेजारी होते. काही जण उठल्यावर दरवाजा ठोठावत शेजार्यांना उठविले. तोपर्यंत आगीने भिषण रौद्ररूप धारण केले. पाठोपाठ पाच घरांमध्ये आग पसरली.
घरांच्या दुसर्या पोट माळ्यावर आगीचे लोट उठले. अतिशय जुने लाकडी घर असल्याने आगीने अधिकच रुद्ररुप घेतले. नागरीक आगीच्या दिशेने कुंभार गल्लीकडे मदतीसाठी धावले. तरूणांनी पाणीपुरवठा सुरू केला. आजूबाजुस असलेल्या चार पाच बोअरवेल सुरु केले. पाण्याचा मारा सुरू केला.तोपर्यंत पोलीस अधिकारी सचिन साळुंखे आपल्या कर्मचार्यांसह घटनास्थळी पोहचले.
सरपंच देवीदास सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगुर्डे, योगेश बधान, माजी जि.प.सदस्य अॅड. ज्ञानेश्वर एखंडे, एमएसईबीचे बंटी देसले, योगेश भदाणे, दीपक मोरे, शेखर बागुल, अमोल जगदाळे, प्रकाश बागुल, शरद बागुल, दिनेश बागुल, रवींद्र बागुल, पवन जगदाळे, सुनील बोरसे, उमेश खैरनार, गोपाल सोनवणे, रवींद्र बागुल, सुरेश जगदाळे, दीपक जगदाळे, संदीप जगदाळे, अक्षय जगदाळे, गजेंद्र कोतकर, देवेंद्र कोठावदे, पत्रकार सुभाष जगताप, मनोहर महाजन, प्रमोद भावसार, संजय भिलाने, नितीन कोतकर, प्रतिक कोतकर, दिलीप माळी, शिवराज गांगुर्डे, राहुल जगताप हे मदतीसाठी आले.
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु झाले. तो पर्यंत सहा घरांना आग लागली होती. सर्व घरातील लोकांना तरूणांनी बाहेर काढले. घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात आले. त्यादरम्यान आग लागलेल्या घरांचे वीज कनेक्शन कट केले. साडे तीन वाजेला आग आटोक्यात आली.
मात्र तो पर्यंत सरलाबाई रमेश बागुल यांच्या घरातील संसार जळून खाक झाला, तसेच बाळु गोटु सोनवणे, गोपाल साहेबराव सोनवणे, जिभाऊ शिवराम बागुल, धोंडु शिवराम बागुल, दिलीप शिवराम बागुल यांचेही घरे जळून खाक झाले. या कुटुंबांचा ऐन दिवाळीला घर व स़ंसार जळून खाक झाला.