Sunday, April 27, 2025
Homeजळगावजिल्हा रुग्णालयात कोरोनाचे नवीन सहा संशयित रुग्ण दाखल

जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे नवीन सहा संशयित रुग्ण दाखल

जळगाव –

जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित नवीन सहा रुग्ण मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दाखल करण्यात आले. त्यांच्या लाळीचे नमुने घेवून ते औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यांचा अहवाल बुधवारी येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या अगोदर या रुग्णालयात मेहरुणमधील एक पॉझिटीव्ह रुग्ण दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
कोरोनासंदर्भातील विशेष तपासणी या रुग्णालयात आतापर्यंत एकूण ७७ रुग्णांची करण्यात आली आहे.

यात एका रुग्णाचा पॉझिटीव्ह, तर ६७ रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दोन रुग्णांचे अहवाल नाकारण्यात आले आहेत. तर संशयित सात रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहे.

मुंबई, पुणे, सुरत किंवा इतर ठिकाणाहून आलेले विद्यार्थी, कारागीर, मजूर, विविध क्षेत्रातील व्यापारी, व्यावसिक आदी जिल्ह्यात आले आहेत.

सुरक्षेेच्या दृष्टीने ते जिल्हा रुग्णालयातील कोरोनासंदर्भातील स्क्रिनिंग ओपीडीत आरोग्य तपासणी करुन घेत आहेत. या स्क्रिनिंग ओपीडीत मंगळवारी १८९ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : “लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ…”; मंत्री...

0
मुंबई | Mumbai लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महायुतीला (Mahayuti) बसलेल्या झटक्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने लागू केली. या...