Friday, December 13, 2024
Homeदेश विदेशबस-ट्रकचा भीषण अपघात; सहा जणांचा होरपळून मृत्यू

बस-ट्रकचा भीषण अपघात; सहा जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेश | Andhra Pradesh
आंध्र प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बापटला जिल्ह्यातील हैदराबाद-विजयवाडा महामार्गावर बुधवारी पहाटे बस आणि ट्रकची धडक झाली. या धडकेत दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. गाड्यांनी पेट घेतल्यामुळे यात सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले आहे. अपघातातील जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस चिन्नागंजमहून हैदराबादला जात होती. ही आग ईतकी भीषण होती की यात दोन्ही वाहने जळून खाक झाली आहे. या अपघातात ट्रक आणि बस चालकाचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान, या धडकेचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात या दोन्ही वाहनांना आग लागल्याचे दिसत आहे. तर दुसरा एक व्हिडीओ आहे ज्यात अग्निशामन दलाचे जवान ही आग विझवत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : मोदींच्या सभेपूर्वी लासलगावला कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांची निर्यातबंदी विरोधात घोषणाबाजी

बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथून एक खासगी बस ४२ प्रवाशांना घेऊन हैदराबादला जात होती. त्यानंतर हैदराबाद-विजयवाडा महामार्गावरील चिलकलुरीपेट मंडळाजवळ बस ट्रकला धडकली. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. बसमध्ये प्रवास करणाऱ्या ४ जणांसह ट्रक चालक आणि बस चालकांना आपला जीव गमवावा लागला.

मृतांमध्ये ३५ वर्षीय बस चालक अंजी, ६५ वर्षीय उपपगुंडूर काशी, ५५ वर्षीय उपपगुंडूर लक्ष्मी आणि मुप्पाराजू ख्याती सासरी नावाच्या ८ वर्षीय मुलीचा समावेश आहे. उर्वरित दोन जणांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या