Saturday, July 27, 2024
Homeनगरशासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत नगर शहरातील सहा हजार नागरिकांना मिळणार लाभ

शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत नगर शहरातील सहा हजार नागरिकांना मिळणार लाभ

अहमदनगर (प्रतिनिधी)

शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत नगर शहरातील सहा हजार 121 लाभार्थ्यांना महापालिकेमार्फत विविध योजनांमधून दाखले, अनुदान व कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार आहे. या लाभार्थ्यांना सुमारे 1.05 कोटींच्या लाभाचे वितरण केले जाणार आहे.

- Advertisement -

या कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील सुमारे 26 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध योजनांमधून, शासकीय प्रक्रियेतून लाभ मिळवून दिला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. याच कार्यक्रमात सहभागी लाभार्थ्यांमध्ये नगर शहरातील नागरिकांनाही लाभ मिळणार आहे.

यात महापालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना (67), रमाई आवास योजना (4), पीएम स्वनिधी कर्ज (347), बचतगट फिरता निधी (10 गट/80 सदस्य), दिव्यांग उदरनिर्वाह अनुदान (1000), वैयक्तिक स्वयंरोजगार (4), पीएमएफएमई – बीज भांडवल (12), एसएचजी बँक लिंकेज (20), आयुष्यमान भारत (557), जननी सुरक्षा योजना (51), कुटुंब कल्याण कार्यक्रम (62), बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (729), राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (374), कुष्ठरोग आणि मानसिक निधी (64), जन्म प्रमाणपत्र (2388), विवाह नोंदणी प्रमाणपत्र (112), नवीन नळ कनेक्शन (310) अशा योजनांमधून नगर शहरातील सहा हजार 121 जणांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे. अनुदान, कर्ज स्वरूपात 1 कोटी 5 लाख 10 हजार रूपयांचे वितरण लाभार्थ्यांना केले जाणार आहे. महापालिका प्रशासनाकडून याचे नियोजन सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या