Saturday, November 23, 2024
Homeनगरमहात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहा वाण प्रसारीत

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहा वाण प्रसारीत

पाच कृषी यंत्रांसह 9 कृषी तंत्रज्ञान शिफारशींनाही मिळाली मान्यता

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि राज्यातील चारही कृषी विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची 52 वी परिषद झाली. या बैठकीच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील तसेच सहअध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे उपस्थित होते. यावेळी कृषी परिषदेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशीद उपस्थित होते. याप्रसंगी चारही कृषी विद्यापीठांचे संचालक उपस्थित होते.

- Advertisement -

कुलगुरू डॉ पी. जी. पाटील म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांनी यावर्षी शेतकर्‍यांसाठी विविध पिकांचे सहा वाण, पाच कृषी यंत्रे-अवजारे आणि 89 कृषी तंत्रज्ञान शिफारशी प्रसारीत करण्यात आल्या आहेत. या वाणांमुळे व तंत्रज्ञान शिफारशींमुळे पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल व नवीन यंत्र व अवजारांमुळे शेतकर्‍यांचे श्रम कमी होतील. डॉ. पी.जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि संचालक संशोधन डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतपिके वाण प्रसारण व शेतपिके वाण संरक्षण आणि शेतकरी अधिकारी कायद्यांतर्गत या कृषी विद्यापीठाच्या नवीन वाण आणि तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या व त्यास समितीने मान्यता दिली. या बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहा वाण, पाच कृषी यंत्रे, 89 पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी आणि दोन जैवीक व अजैवीक ताण सहन करणार्‍या स्त्रोतांना मान्यता देण्यात आली.

यामध्ये भात (व्ही.डी.एन.-1808), ऊस-फुले 15006 (एमएस 16081), दुधी भोपळा-फुले गौरव (आरएचआरबीजी-54), दोडका-फुले किरण (आरएचआरआरजीए.-3), कांदा-फुले स्वामी (आरएचआरओआर-12), टोमॅटो-फुले सूर्या (आरएचआरटीएच.- 3ु5) हे वाण प्रसारीत करण्यात आले. तसेच फुले भेंडी प्लकर, फुले मका कणीस सोलणी व दाणे काढणी यंत्र, फुले अंजीर प्लकर, फुले पोर्टेबल हायड्रॉलीक जनावरे उचलण्याचे यंत्र व फुले गुळ घोटणी यंत्र प्रसारीत करण्यात आले असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या