Sunday, October 18, 2026
Homeपडसादअकरावी प्रवेश प्रक्रियेत बासष्ट हजार प्रवेश निश्चित

अकरावी प्रवेश प्रक्रियेत बासष्ट हजार प्रवेश निश्चित

नाशिक। Nashik

- Advertisement -

अकरावी प्रवेश प्रक्रियेत नाशिक विभागात 62 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. पहिल्या फेरीतून 52 हजार, 537 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, उर्वरित 9 हजार 497 विद्यार्थ्यांना कोट्याच्या जागांवर संधी मिळाली आहे.

शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये अकरावीच्या केंद्रिभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. या फेरीत सहभागी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी मुदत दिलेली होती. निर्धारित मुदतीत विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यावयाचे होते.

गेल्या सोमवारपासून महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची गर्दी बघायला मिळत होती. शेवटच्या दिवसापर्यंत प्रवेश निश्चितीची लगबग कायम राहिली. प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता दुसर्‍या नियमित फेरीचे वेध लागले आहेत.

बुधवारी (दि.9) रिक्त जागांचा तपशील शिक्षण विभागातर्फे जाहीर केला जाणार आहे. याच दिवशी दुसर्‍या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...