रावेर । प्रतिनिधी
रावेर, यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या आहे. मात्र त्यांच्या हाताला काम मिळत नाही. दिवसेंदिवस बेरोजगारीचा वाढता प्रश्न चिंताजनक आहे. यावर मात करावयाची असेल तर सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवून त्यांच्यात स्किल निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी भावी काळात रावेर मतदार संघात कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचा संकल्प केला असल्याची माहिती महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी दिली.
महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. अधिकाधिक मतदारांच्या भेटी घेवून त्यांच्याशी विविध विषयावर संवाद साधण्याचा या काळात प्रयत्न केला आहे. रावेर मतदार संघातील युवकांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी त्यांच्यात कौशल्य निरामन करून त्यांच्या हाताला काम मिळवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करणार आहे. यासाठी युवकांनी आपल्याला साथ द्यावी असे आवाहन उमेदवार धनंजय चौधरी यांनी प्रचारफेरीत युवकांशी बोलताना केले.
रावेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी रावेर तालुक्यातील भाटखेडा, उटखेडा, चिनावल, रोझोदा, विवरा खुर्द, विवरा बुद्रुक, निंभोरा, फैजपूर येथे प्रचार दौरा करीत मतदारांशी संवाद साधला. यावेळी उमेदवार धनंजय चौधरी यांच्यासोबत कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, यशवंत धनके, माजी नगरसेवक योगेश गजरे, सोपान साहेबराव पाटील, यशवंत महाजन, महेश लोखंडे, महेंद्र गजरे, राजेंद्र पानपाटील, लक्ष्मण मोपारी, आदिवासी नेते दिलरुबाब तडवी, गुलशान तडवी, प्रतीक पाटील, सलीम तडवी, अशोक हिवरे, माजी सरपंच कैलास पाटील, डॉ.अनिल पाटील, राजेंद्र पाटील, अमोल पाटील, काशिनाथ कोळी, जगन्नाथ महाजन, छगन मेंबर, अप्पा महाजन, सुरेश महाजन, बाळू माधव पाटील, बशीर तडवी यांच्यासह यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.