Saturday, September 12, 2026
Homeदेश विदेशमोठी दुर्घटना! गोदामचे छत कोसळून ५ जणांचा मृत्यू, अनेक कामगार अडकले, मृतांचा...

मोठी दुर्घटना! गोदामचे छत कोसळून ५ जणांचा मृत्यू, अनेक कामगार अडकले, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दक्षिण कोलकातामधील ताराताला ट्रान्सपोर्ट डेपोजवळ बांधकाम सुरू असलेले एक गोदामाचे शेड अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. भल्यामोठ्या या गोदामाच्या छताखाली अनेक कामगार अडकल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून चौघांना रेस्क्यू करण्यात यश आले. ५० ते ५५ हून अधिक लोक छताखाली अडकल्याचं सांगितलं जात आहे

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी गोदामात स्लॅबचे काम सुरू होते. पोलिसांच्या माहितीनुसार, कोलकाता पोलीस, आपत्ती व्यवस्थापन गट, नागरी संरक्षण, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि लष्कर देखील बचावकार्यात सहभागी झाले आहेत. ढिगारा आणि लोखंडी सळ्या काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या किंकाळ्याही ऐकू येत असून, त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

पावसात डब्याचा दरवाजा बंद करण्यावरुन वाद; धावत्या लोकलमध्ये एकाला चाकूनं भोसकलं

पश्चिम कोलकाता भागातला तारातला ठाणे क्षेत्र परिसरात ब्रेस ब्रीजजवळ एक निर्माणाधीन गोडाऊनचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. दुपारी १२ च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा छत अचानक कोसळले तेव्हा अनेक कामगार इमारतीच्या आत काम करत होते. मोठे लोखंडी बीम आणि काँक्रीटचा मलबा कामगारांच्या अंगावर पडला आणि ते त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यामुळे या घटनेत मृतांचा आकडा मोठा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या