गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काही गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका केली आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश भोये यांना गुप्त माहिती मिळाली की काही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बर्हाटे वस्ती येथे ठेवलेली आहेत. त्या माहिती च्या आधारे दि. 3 रोजी त्या ठिकाणी जावून पहाणी केली असता एमएच 17 बीडी 0112 क्रमांक असलेल्या पिक अप व त्यामध्ये काही जनावरे डांबून ठेवल्याच्या परिस्थितीत मिळाले. त्या ठिकाणाहून पाच लाख रुपये किंमतीचा एक पिकअप, एक लाख साठ हजार रुपये किंमतीची गोवंशीय जातीचे जनावरे असा एकूण सहा लाख साठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस नाईक सोमनाथ झांबरे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन आसिम आतिक शेख रा. चांदा व अविनाश मोहन बर्हाटे रा. घोडेगाव (बर्हाटे वस्ती) यांच्या विरुद्ध गुन्हा र. नं. 371/2025 महाराष्ट्र पशु संरक्षण चे कायदा कलम 5(अ), (ब), 9(ब), प्राण्यांना निर्दयतेने वागवणे कलम 3,11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश भोये, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस हवालदार दीपक घाटकर, हवालदार शामसुंदर गुजर, पोलीस हवालदार बिरप्पा करमल, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस नाईक सोमनाथ झांबरे, पोलीस कॉस्टेबल विशाल तनपुरे, सहाय्यक फौजदार रामभाऊ भांड यांच्या पथकाने केली.




