Tuesday, April 29, 2025
Homeक्राईमकारवाईसाठी थांबलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

कारवाईसाठी थांबलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

पाठलाग करून पिकअप पकडला || चौघे ताब्यात, 32 जनावरांची सुटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कत्तलीसाठी नेल्या जाणार्‍या गोवंशीय जनावरांची गाडी अडवून कारवाईसाठी थांबलेल्या कोतवाली पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव येथे घडली. सुप्याकडून नगरच्या दिशेने बोलेरो पिकअपमधून गोवंशीय वासरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोनेवाडी चौक, केडगाव येथे हा पिकअप अडवण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

चालकाने पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मदतीसाठी आलेल्या निरंजन कारले याच्या हातावर पिकअपमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने धारदार वस्तूने मारहाण करून जखमी केले. पथकाने वाहनचा पाठलाग करून झेंडीगेट येथे पिकअप फिल्मी स्टाईलने ताब्यात घेतला. त्यातून 32 वासरांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी आलक्या कृष्णा काळे (वय 50), संदीप आलक्या काळे (वय 24), आलेश काळे (वय 22), अशोक आलक्या काळे (वय 26, सर्व रा. औसरी खुर्द, ता. आंबेगाव) या चौघांना ताब्यात घेतले. अंमलदार राजेंद्र चंद्रभान पालवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानचा माजी ‘पॅरा कमांडो’

0
दिल्ली । Delhi २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे भीषण दहशतवादी हल्ला झाला. पाच ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या लोकांवर अचानक गोळीबार केला....