Friday, April 25, 2025
Homeजळगावमहायुतीकडून जळगावसाठी स्मिता वाघ, रावेरसाठी रक्षा खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून जळगावसाठी स्मिता वाघ, रावेरसाठी रक्षा खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत महायुतीचे शक्तीप्रदर्शन

जळगाव – लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतीम दिवशी गुरूवारी महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अर्ज भरण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची आज अंतीम मुदत होती. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बुधवारी अर्ज दाखल केल्यानंतर गुरूवारी महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात जळगाव लोकसभेसाठी भाजपाच्या माजी आमदार स्मिता वाघ तर रावेर लोकसभेसाठी विद्यमान खा. रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह समन्वयक आमदार मंगेश चव्हाण, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, मनसेचे माजी आमदार अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर, ज्ञानेश्वर महाजन, मनोज बियाणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराणेशाहीवरून महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...