दिल्ली | Delhi
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात खासदारांचं एक प्रतिनिधी मंडळ आज हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहे. काँग्रेस नेत्यांच्या या दौऱ्यावर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी टीका केली आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी वाराणसीत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “राहुल गांधी हे पीडितेच्या न्यायासाठी नाही तर राजकारणासाठी हाथरसला जात आहेत. जनतेला काँग्रेसचे रणनीती ठाऊक आहे. यामुळे २०१९ मध्ये जनतेनं भाजपाला निवडून दिलं. लोकांना माहित आहे की ते पीडितेला न्याय देण्यासाठी नाही तर राजकारण करण्यासाठी हाथरसला जात आहेत.”
दरम्यान, प्रियंका गांधी यांनी हाथरस प्रकरणी पुन्हा एकदा योगी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी असे म्हटले की, युपी सरकार नैतिक स्वरुपाने भ्रष्ट आहे. पीडितेला उपचार मिळाला नाही, योग्य वेळी तक्रार दाखल केली गेली नाही, मृतदेह जबरदस्तीने जाळण्यात आला, परिवार बंदीत आहे, त्यांना दाबले जात आहे. त्यानंतर आता परिवाराला धमकी दिली जात आहे की, त्यांची नार्को टेस्ट होणार आहे. हा व्यवहार देशाला मान्य नाही. पीडितेच्या परिवाराला धमकावणे बंद करा.