Tuesday, September 17, 2024
HomeनाशिकNashik News : जिल्ह्यात आतापर्यंत 'इतक्या' महिलांनी भरले 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण...

Nashik News : जिल्ह्यात आतापर्यंत ‘इतक्या’ महिलांनी भरले ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभापासून एकही पात्र लाभार्थी बहीण वंचित राहता कामा नये, यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिकउपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी ऑनलाईन (Online) बैठकीत दिल्या.

हे देखील वाचा : Yashashri Shinde Murder Case : आरोपी दाऊद शेखला पोलीस कोठडी; हत्येचे कारणही सांगितलं

जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector Office) मध्यवर्ती सभागृहात दूरदृश्यप्रणालीद्वारे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी पालकमंत्री भुसे यांच्यासह राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, मुफ्ती मोहम्मद इस्माईल, अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आदित्य मिरखेलकर, जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, महिला बालकल्याण अधिकारी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी सुनिल दुसाने यांच्यासह नाशिक महानगपालिका व संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी सभागृहात उपस्थित होते.

हे देखील वाचा : Nashik News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जिल्ह्यात ‘इतक्या’ महिलांचे अर्ज प्राप्त

पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शासकीय यंत्रणेसाबतच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी देखील आपल्या स्तरावर लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच या योजनेचा अर्ज आधारकार्डसोबत संलग्नीत करण्यात येणार असल्याने अर्ज इंग्रजी भाषेतून भरून घेणे आवश्यक असल्याने यापूर्वी भरलेल्या अर्जाबाबत ऑनलाईन माहिती भरतांना झालेल्या बदलांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. तर अतिदुर्गम भागातील महिलांचे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, रेशन दुकानदार यांचे देखील सहाय्य घेण्याचे निर्देश पालकमत्र्यांनी दिले.

हे देखील वाचा : Kerala Landslide : वायनाडमध्ये आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

दरम्यान, जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी जिल्हातील नोंदणीची माहीती देताना जिल्ह्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने स्थलांतरीत लाभार्थी अर्जदार देखील ग्रामसेवक व सरपंच यांच्या मदतीने कोठूनही अर्ज भरू शकणार आहेत. तसेच या योजनेच्या लाभासाठी गाव/पाड्यातील लाभार्थी महिला वंचित राहू नये याकरीता पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येवून अधिकाधिक पात्र महिलांना योजनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. व जिल्हातील नोंदणीची स्थिती आकडेवारीनुसार विषद केली.  

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची सद्यस्थिती

महानगरपालिका एकूण अर्ज – १,४८,३४९ (ऑफलाईन अर्ज ८३,९१७, ऑनलाईन अर्ज ६४,४३२०), नगरपालिका – नगरपरिषद एकूण अर्ज – ८४,३०३ (ऑफलाईन अर्ज – ३६,९५४, ऑनलाईन अर्ज – ४७,३४९), जिल्हा परिषद एकूण अर्ज – ५, ८७,२५० (ऑफलाईन अर्ज -२,०५,२६२, ऑनलाईन अर्ज – ३,८१,९८८) एकूण ८,१९,९०२ (ऑफलाईन अर्ज – ३,२६,१३३ आणि ऑनलाईन अर्ज – ४,९३,७६९)

हे देखील वाचा : इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाचा भडका उडणार; हमासच्या प्रमुखाची हत्या

तालुकानिहाय १ ते ३० जुलै २०२४ अखेर ऑनलाईन अपलोड केलेले अर्ज

पेठ – १८,२१३, नाशिक – १,५३,९०२, सिन्नर – ४३,०२५, दिंडोरी – ४८,३६७, सुरगाण – २८,७१२, त्र्यंबक – २३,४८८, निफाड – ६०,४३३, इगतपुरी – २७,२५५, चांदवड – ३२,५३०, देवळा – १७,०६०, नांदगाव – २८,८३९, मोलगांव – ९३,४६२, बागलाण – ३८,२२०, येवला – ३२,००८, कळवण – २७,०४४, एकूण – ६,७२,५५८

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या