Thursday, January 8, 2026
Homeनाशिकनाशिक शिक्षक मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 'इतके' टक्के मतदान

नाशिक शिक्षक मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान

नाशिक | Nashik

विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) मुंबई आणि कोकण पदवीधर व मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी आज बुधवार (दि.२६) रोजी सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. यातील नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या सकाळपासून रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : विधानपरिषदेच्या मतदारसंघांसाठी सकाळपासून मतदान सुरु; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

YouTube video player

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teacher Constituency Election ) निवडणुकीत यंदा २१ उमेदवार रिंगणात असून आज या सर्व उमेदवारांच्या भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. तसेच नाशिक शिक्षक विभागात ९० मतदान केंद्रांवर मतदान होत असून नाशिक जिल्ह्यात २९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात ११ वाजेपर्यंत किती मतदान?

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजेपासून मतदान (Voting) सुरु झाल्यानंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत ८ टक्के इतके मतदान झाले होते. तर सकाळी अकरा वाजेपर्यंत २३.१६ टक्के मतदान झाले होते. त्यात नंदुरबार २६.३५, धुळे २६.६५, जळगाव २०.०५ नाशिक २५.२२ आणि नगरमध्ये १९.९१ टक्के मतदान झाले होते.

त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत नाशिक शिक्षक मतदारसंघात ४३.४७ टक्के मतदान झाले आहे. यात नाशिक ४५.४४ नंदुरबार ५०.७७, धुळे ४७.२५, जळगाव ४०.७५ आणि नगरमध्ये ३८.६४ टक्के मतदान झाले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातील ६९ हजार ३६८ मतदारांपैकी दुपारी एक वाजेपर्यंत ३० हजार १५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

नगरसेवक

Ambernath: अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ‘ते’ १२ नगरसेवक भाजपच्या गोटात

0
मुंबई | Mumbaiअंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसने केलेली युती राज्यात चर्चेत ठरली आहे. येथील सत्ताधारी भाजपला काँग्रेस नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावरुन पाठिंबा दिला होता. त्यावरुन, सुरू...