Saturday, November 23, 2024
Homeनगरसोशल मीडियासह कार्यकर्ते झाले थंड; आता निकालाकडे नजरा

सोशल मीडियासह कार्यकर्ते झाले थंड; आता निकालाकडे नजरा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार (दि.13) मे रोजी मतदान झाल्यानंतर मतदारांचे आभार मानत निवडणुकीतील उमेदवारांसह कार्यकर्ते आणि नेते मंगळवारी दिवसभर थंड दिसून आले. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांच्या कडाक्याच्या उन्हात प्रचार करून दमलेल्या या सर्वांनी मंगळवारी दिवसभर आराम करणे पंसत केले. मात्र, मतदानानंतर अचानक सोशल मीडिया थंड झाल्याने मतदारांसह सर्वांच चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. दरम्यान आता उमेदवारांसह कार्यकर्ते आणि मतदारांच्या निवडणुकीच्या निकालाकडे नजरा राहणार आहे.

- Advertisement -

नगर लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पारपडली. सुमारे पावणे दोन महिन्यांपासून सुरू असणारा संग्राम संपला असून आता सर्वच निवांत झाल्याचे दिसत आहे. ऐन उन्हाळ्यातील कडाक्याच्या उन्हात सर्वांची मोठी धावपळ झाली असून उन्हाचे चटके सोसत आपल्या लडक्या उमेदवारासाठी पळापळ करणारे मतदानानंतर गायब झाले आहे. गेल्या दीड ते पावणे दोन महिन्यांपासून सकाळी लवकर उठून प्रचार, मोठ्या नेत्यांच्या सभा यात व्यस्त असणारे मतदानानंतर आता निवांत झाले आहेत. दीड महिन्यांपासून केलेली पळपळ कशी सार्थक लागले. आपल्या नेता विजयी होईल की नाही, याची चिंता करतांना ते दिसत आहेत.

मंगळवारी अचानक निवडणुकीत एकमेंकावर लक्ष ठेवून चुका, त्रुटी आणि टीका करण्याची एकही संधी न सोडणारे अचानक गायब झाल्याने सामान्य नागरिक देखील आज काहीच नाही, सर्वजण गायब झाले आहेत, असे म्हणताना दिसत होते. आता 4 जूनपर्यंत आराम करून मतदानाच्या दिवशी कोणत्या भागात कोणाला मतदान झाले, आपल्या नेत्याला किती मतदान पडणार याची खतर जमा करण्यात कार्यकर्ते आणि समर्थक व्यस्त होणार आहेत. त्यानंतर निवडणुकीच्या प्रत्यक्ष निकालासाठी 4 जूनची वाटप पाहवी लागणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या