नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. निजामुद्दीन भागातून पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. मेधा पाटकर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाले होते. दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचा अवमान केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यानुसार आज त्यांना दिल्लीतील साकेत कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण?
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर त्यांच्या नर्मदा बचाओ आंदोलनासाठी ओळखल्या जातात. २००० साली त्यांच्याविरोधात दिल्लीत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी २००१ मध्ये मेधा पाटकर यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. साकेत कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंह यांनी मेधा पाटकर यांना कोर्टात हजर न राहणे आणि जाणुनबुजून शिक्षेशी निगडीत आदेशाचे पालन न करणे असा ठपका ठेवला. कोर्टाचा अवमान करून सुनावणीपासून पळ काढण्याचा हा त्यांचा हेतू होता. त्यामुळे पाटकरांना कोर्टासमोर हजर करणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले होते. पाटकरांना २३ वर्षे जुन्या प्रकरणात शिक्ष सुनावण्याती आली. पण त्यांच वय आणि आरोग्य लक्षात घेता त्यांना तुरुंगवासाच्या शिक्षेतून सूट देण्यात आली. पण नुकसानभरपाई आणि बॉन्ड भरण्याचे आदेश दिले गेले होते.
मेधा पाटकर यांना २००० साली दाखल केलेल्या खटल्याची शिक्षा २०२४ मध्ये सुनावण्यात आली आहे. सक्सेना यांना मानहानीच्या खटल्यामध्ये त्यांना दोषी ठरवले गेले होते. न्यायालयाने त्यांना २३ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना दोषी ठरवत तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने त्यांना व्हीके सक्सेनाला १० लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देशही दिले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (एएसजे) विशाल सिंह यांनी मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा