Monday, May 20, 2024
Homeनगर28 लाखांच्या 13 सोलर पंपाची परस्पर विल्हेवाट

28 लाखांच्या 13 सोलर पंपाची परस्पर विल्हेवाट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

28 लाख 41 हजार 148 रूपये किंमतीच्या 13 सोलर पंपाची (Solar Pump) परस्पर विल्हेवाट लावून, तसेच कंपनीची व लाभार्थींची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत (MIDC Police) तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज हा सरकारचा…; आ. थोरातांची संतप्त प्रतिक्रिया

याप्रकरणी गणेश शिंदे (रा. नागापूर, नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात (MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सागर गावडे (रा. राजुरी फलटण, जि. सातारा), अभिजीत मगरे (रा. श्रीरामपूर), अक्षय गोसावी (रा. श्रीरामपूर) यांच्याविरूध्द भादंवि कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे.

अंबडच्या लाठीमाराचा जिल्ह्यात निषेध

जानेवारी ते 20 ऑगस्टपर्यंत नॉर्दन लाईट एसेट मॅनेजमेंट कंपनीचा (वडगाव, गुप्ता, ता. नगर) ठेकेदार सागर गावडे याने 3 सोलर पंप (Solar Pump) किंमत 7 लाख 41 हजार 148 रूपये आणि आरोपी मगरे व गोसावी या दोघांनी 10 सोलर पंप (Solar Pump) किंमत 21 लाख रूपये असे एकूण 28 लाख 41 हजार रूपये किंमतीच्या 13 सोलर पंपाची परस्पर विल्हेवाट लावली. तसेच फिर्यादीच्या कंपनीची आणि लाभार्थी शेतकर्‍यांची फसवणूक (Farmer Fraud) केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चाहेर करत आहेत.

गुन्हेगाराने पकडली पोलिसाची गचांडी

- Advertisment -

ताज्या बातम्या