Friday, May 3, 2024
Homeनाशिकउच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवा; शिक्षण संचालकांकडे मागणी

उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवा; शिक्षण संचालकांकडे मागणी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांचे (Highly educated primary teachers) प्रश्न सोडवावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य एम. एड. प्राथमिक शिक्षक कृती समितीतर्फे (Maharashtra State M. Ed. Primary Teacher Action Committee) शिक्षण संचालक (Director of Education) यांच्याकडे करण्यात आली.

- Advertisement -

एससीआरटी पुणे (SCRT Pune) येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर (Maharashtra State Director of Primary Education Dinkar Temkar) यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध संघटनेचे अध्यक्ष व त्यांच्या मागण्यांविषयी बैठक बोलविली होती. त्यावेळी ही मागणी करण्यात आली.

या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक कृती समितीचे राज्य अध्यक्ष राजू जाधव (Raju Jadhav, State President of Maharashtra State Primary Teachers Action Committee) यांनी प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये (Primary education sector) अनेक शिक्षक (teachers) हे बीएड (B.Ed.), एमएड (M. Ed.), नेट-सेट (Net-set), पीएचडी (PHD) (शिक्षणशास्र)असे शिक्षण क्षेत्रामध्ये उच्चशिक्षित आहेत.

विविध क्षेत्रातून शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या पदवीधारकाना शैक्षणिक विभागात (Department of Education) पदावर घेतले जातात. परंतु, शिक्षण क्षेत्रातील पदवी असलेल्या कोणत्याही पदवीधारकांना दुसर्‍या क्षेत्रात संधी देत नाहीत. म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणार्‍या उच्चशिक्षित शिक्षकांना त्या त्या पदावर त्या त्या क्षेत्रांमध्ये पदस्थापना देण्यासंदर्भात विचार केला जावा, अशी आग्रहाची मागणी राजू जाधव यांनी केली. शिवाय सध्या शिक्षण क्षेत्रांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण येत आहे.

त्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या तत्त्वानुसार सेवेमध्ये कार्यरत असणार्‍या उच्चशिक्षित सेवकांना वरिष्ठ पदावर कार्य करण्याच्या संधी दिल्या जाव्यात. त्यानुसार इतर केडरमध्ये ज्याप्रमाणे सेवेत कार्यरत असणार्‍या विविध प्रकारच्या पदोन्नतीच्या संधी उपलब्ध आहेत. तशा प्रकारच्या संधी प्राथमिक शिक्षकांना विहित मुदतीत उपलब्ध करुन द्याव्यात.

जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा शिक्षण क्षेत्रामध्ये फायदा होऊ शकतो. शिवाय 2014 सेवा शर्ती अधिनियम दुरुस्ती करून केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी या पदावर सरळसेवेने प्रविष्ट होण्यासाठी वयाची अट नष्ट करून शंभर टक्के प्राथमिक शिक्षकांमधूनच ही पदे भरली जावीत, अशी मागणी राज्य अध्यक्ष राजू जाधव यांनी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्याकडे केली. यावेळी एमएड कृती समितीचे राज्य सरचिटणीस प्रदीप शिंदे, सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजी माने, कार्यालयीन चिटणीस देवीप्रसाद तावरे व राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या