Tuesday, May 21, 2024
Homeनगरमुलाला मारहाण करणार्‍या बापाला कारावास

मुलाला मारहाण करणार्‍या बापाला कारावास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुलाला मारहाण करणार्‍या बापाला दीड वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.सहारे यांनी ठोठावली आहे. नवनाथ पोपट काळे (वय 52 रा. जामगाव ता. पारनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील विष्णुदास के. भोर्डे यांनी पाहिले.

- Advertisement -

दरम्यान,आरोपी काळे याने पत्नीवर हल्ला केल्याप्रकरणी त्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. ती शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने मुलावर हल्ला केला. 1 एप्रिल 2022 रोजी आरोपी काळे त्याच्या आईसोबत बोलत असताना त्याचा मुलगा निहाल काळे तेथे आला. त्याने आरोपीला घरात घेण्यास विरोध केला. त्याचा राग आल्याने आरोपीने निहालवर चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात निहाल जखमी झाला होता.त्याच्या फिर्यादीवरून आरोपी काळे विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक राजेश काळे यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.सदर खटल्यात सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सदरच्या खटल्यात सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तीवाद व न्यायालयासमोर नोंदविलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी नवनाथ काळे याला शिक्षा ठोठावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या