Thursday, May 15, 2025
Homeमनोरंजनसोनम कपूर झाली आई; घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

सोनम कपूर झाली आई; घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. शनिवारी दुपारी सोनमने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

- Advertisement -

अभिनेता रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. नीतू कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, २० ऑगस्ट २०२२ रोजी आम्ही आमच्या मुलाचं स्वागत केलं आहे. या सुंदर प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार. ही फक्त सुरुवात आहे. मात्र आपल्याला माहित आहे का? की, आता आपलं जीवन कायमचं पूर्णपणे बदलणार आहे. सोनम आणि आनंद.

सोनम कपूरने २०१८ साली मुंबईत उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्न केले. काही महिन्यांपूर्वी सोनम आणि आनंदने त्यांच्या पहिल्या मुलाची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.

दोघांनी त्यांचे काही सुंदर फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते. त्यावेळी देखील त्यांची पोस्ट सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाली होती. त्याचबरोबर दोघांना चाहत्यांनी शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी घसरली ; सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक विस्कळीत

0
जळगाव - jalgaon अमळनेर रेल्वे स्टेशनजवळ (Railway station) आज दि.१५ रोजी दुपारच्या सुमारास मालगाडीचे डबे रूळावरून घसरल्याने अपघात (Accident) घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली...