Thursday, March 13, 2025
Homeनगरसोनोग्राफी सेंटरचे होणार प्रती परीक्षण

सोनोग्राफी सेंटरचे होणार प्रती परीक्षण

गर्भलिंग निदान चाचणी विरोधात जिल्ह्यात विशेष मोहीम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधात्मक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी यापूर्वीच आरोग्य सेविका व अंगणवाडी कर्मचार्‍यांमार्फत प्रत्येक गर्भवती महिलेवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आता नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणार्‍या सोनोग्राफी सेंटरचे अन्य तालुक्यातील यंत्रणेमार्फत प्रती परीक्षण (क्रॉस चेकिंग) करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे.
याबाबत मागील आठवड्यात बुधवारी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत.

- Advertisement -

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी राज्यातील आरोग्य अधिकार्‍यांची ऑनलाईन बैठक घेतली होती. यात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधात्मक कायद्यातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करा. त्यातून गर्भलिंग निदान केंद्रांवर जरब बसायला हवी, अशी सूचना त्यांनी दिली. त्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी देखील शासकीय आरोग्य यंत्रणेसह खाजगी आरोग्य यंत्रणेत काम करणार्‍या डॉक्टरांची बैठक घेतली. या बैठकीत यांनी देखील गर्भलिंग चाचणी कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना दिली आहेत.

या कायदेची अंमलबजावणी करताना खाजगी रुग्णालय यांचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्याची सूचना केली. यामुळे जिल्ह्यात आता पुढील काळात असणार्‍या सोनोग्राफी सेंटरचे तालुकानिहाय क्रॉस चेकिंग करण्यात येणार असल्याचे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. नागनाथ चव्हाण यांनी सांगितले.

सोनोग्राफी सेंटरची पोलखोल करणार्‍या महिलेला लाखाचे बक्षीस
जिल्ह्यात गर्भलिंग कायदा पायदळी तुटवणार्‍या सोनाग्राफी सेंटरची पोलखोल अथवा स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभागी होणार्‍या महिलेला एक लाखांचे बक्षीस देण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

अशी आहे जिल्ह्यातील स्थिती
नगर जिल्ह्यात 152 सोनोग्राफी तपासणी सेंटर आहेत. यातील 27 सेंटर हे वेगवेगळ्या कारणामुळे बंद आहेत. दर तीन महिन्यांला यंत्रणेकडून या केंद्राची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी जिल्ह्यात 15 जानेवारीला जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...