Thursday, April 3, 2025
Homeमनोरंजनसोनू सूदची BMC विरोधात उच्च न्यायालयात धाव; आज सुनावणी?

सोनू सूदची BMC विरोधात उच्च न्यायालयात धाव; आज सुनावणी?

मुंबई | Mumbai

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने बीएमसीच्या (BMC) नोटीशी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उपनगरी जुहू येथील निवासी इमारतीत परवानगी न घेता बेकायदा बदल केल्याच्या आरोपाखाली BMC ने सोनू सूदला नोटीस बजावली होती.

- Advertisement -

BMC ने बजावलेल्या नोटीसविरोधात शहर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करूनही अंतरिम दिलासा मिळू न शकल्याने सोनूने अॅड. धीरेंद्र प्रतापसिंह यांच्यामार्फत अपील केले आहे. पालिकेची नोटीस रद्द करावी किंवा तूर्तास त्यावरील कठोर कारवाईला मनाई करावी, अशा विनंतीचा अर्जही त्याने केला आहे. त्यावर आज (सोमवारी) प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे.

जुहूमधील ए. बी. नायर मार्गावर ‘शक्तीसागर’ नावाची सहा मजली इमारत सोनूच्या मालकीची आहे. महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायद्यांतर्गत इमारतीत अनियमित बदल केले आणि जागेचा वापर बदलून निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर केले. हे सारे करण्यापूर्वी पालिकेची आवश्यक परवानगी घेतली नाही, असे तपासणीत आढळल्यानंतर पालिकेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोनूला एमआरटीपी कायद्यांतर्गत नोटीस बजावली होती. त्याविरोधात सोनूने दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून कठोर कारवाई होऊ नये म्हणून तातडीचा अर्जही केला होता. मात्र, दिवाणी न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावतानाच त्याविरोधात अपील करण्यासाठी त्याला तीन आठवड्यांची मुदत दिली होती. त्याचा अर्ज फेटाळला जाताच पालिकेने जुहू पोलिसांत चार जानेवारीला लेखी तक्रार दिली. मात्र, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

दरम्यान, दबंग’, ‘जोधा-अकबर’ आणि ‘सिंबा’ सारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी सोनू सूद ओळखला जातो. मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजुरांसाठी केलेल्या मदतीमुळे सोनू सूद याची लोकप्रियता प्रचंड वाढली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता, वाणीनगर कमानी जवळ एका अल्पवयीन मुलावर (वय 17) धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात तो जखमी...