Sunday, March 30, 2025
Homeमनोरंजनसोनू सुदने ठेवल्या स्वत:च्या 8 मालमत्ता गहाण

सोनू सुदने ठेवल्या स्वत:च्या 8 मालमत्ता गहाण

नवी दिल्ली – New Delhi

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याच दरम्यान अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या होत्या.

- Advertisement -

त्याचबरोबर रोजगार नसल्यामुळे अनेकांनी आपल्या गावचा रस्ता धरला होता. यात परराज्यातील लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

पण लॉकडाऊनमुळे दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे काहींना तर पायी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान अभिनेता सोनू सुद या लोकांच्या मदतीसाठी देवदूत बनून धावून आला.

या दरम्यान सोनूने लोकांना आपल्या गावी पोहचवण्यापासून त्यांना नोकरी किंवा रोजगार मिळवून देण्यासाठी मोलाची मदत केला. त्याचबरोबर अनेकांची घरे देखील त्याने बांधून दिली. त्यातच आता आणखी एक पाऊल पुढे जात त्याने गरजूंची मदत करण्यासाठी आपल्या स्वत:च्या आठ मालमत्ता गहाण ठेवत, 10 कोटी रुपयांचे त्याने कर्ज घेतले आहे.

48 वर्षीय सोनू सूद आणि त्याची पत्नी सोनाली यांच्या नावावर या सर्व मालमत्ता आहेत. यामध्ये दोन दुकाने आणि सहा अपार्टमेंट यांचा समावेश आहे. मुंबईचा पॉश एरिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या जुहू परिसरामध्ये या सर्व मालमत्ता आहेत.

मनी कंट्रोलकडे उपलब्ध असलेल्या नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, सोनूने जुहू येथील शिव सागर सीजीएचएस मधील तळ मजल्यावरील दोन दुकाने आणि सहा फ्लॅट गहाण ठेवले आहेत. ही इमारत मुंबईतील इस्कॉन मंदिराजवळ एबी नायर रोडलगत आहे.

15 सप्टेंबर रोजी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेबरोबर सोनू सूदने करार केला आणि 24 नोव्हेंबर रोजी कर्जाची नोंद झाली. सोनू सूदने 10 कोटी कर्जासाठी नोंदणी फी म्हणून 5 लाख रुपये दिले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : आई-वडिलांच्या मृत्यूनंतर पाचव्या दिवशीच समृद्धीने घेतला अखेरचा श्वास

0
ओझे | वार्ताहर | Oze दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये आई-वडिलांच्या (Parents) निधनानंतर गंभीर जखमी झालेली मुलगी समृद्धीचेही...