मुंबई |Mumbai –
आयपीएल स्पर्धा महिला क्रिकेटपटूंसाठीही आयोजित केली जावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. Women’s IPL मात्र, आता याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले आहे. BCCI president Sourav Ganguly
जेव्हापासून पुरुषांच्या आयपीएलला प्रारंभ झाला तेव्हापासूनच महिलांसाठीही ही स्पर्धा घेता येईल का? यावर तत्कालीन सदस्यांनी विचार सुरू केला होता. मात्र, प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने या स्पर्धेबाबत धोरणात्मक निर्णय झाला नाही.
आता गेल्या काही वर्षांपासून महिला क्रिकेटची प्रगती होताना दिसत असून देशाच्या संघाला सातत्याने नवी गुणवत्ता मिळावी यासाठी लवकरच महिलांची आयपीएल स्पर्धा देखील आयोजित केली जावी, या प्रस्तावावर सर्व सदस्यांचे एकमत आहे.
त्यामुळे येत्या काळात सर्व आराखडा तयार केला जाईल व या स्पर्धेचा शुभारंभ होइल, असेही गांगुली यांनी स्पष्ट केले आहे. दरनृम्यान महिलांची आयपीएल स्पर्धा येत्या 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.