Monday, June 9, 2025
Homeमनोरंजनप्रसिद्ध अभिनेत्रीच्या मृत्यूने खळबळ; राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मृत्यूने खळबळ; राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

- Advertisement -

आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अपर्णा पी नायर तिरुअनंतपुरम (केरळ) येथे तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली. गुरुवारी ३१ ऑगस्टला संध्याकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिरुवनंतपुरम येथील अपार्टमेंटमध्ये अपर्णा नायरचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ३१ ऑगस्टला संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना समोर आली. त्यावेळी तिची आई आणि बहीण घरात होती.

भारताविरुद्ध सामन्यापूर्वी पाकिस्तानची चिंता वाढली; ‘हा’ स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त

करमना पोलिसांनी अपर्णा नायरच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी कुटुंबीय आणि नातेवाइकांचा जबाब नोंदवला आहे. मृत्यूच्या काही तास आधीच सोशल मीडिया अकाउंटवरून तिने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.

मळ्यालम अभिनेत्री (Actress) अपर्णा नायरच्या मृत्यूच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. अपर्णा नायरने चंदनमाझा, आत्मसखी, मैथिली विंदुम वरुम आणि देवस्पर्शम यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. काही चित्रपटांमध्येही तिच्या खास भूमिका होत्या. निवेद्यममध्येही तिनं अभिनय केला होता. याशिवाय मल्लू सिंह, थट्टाथिन मरायथु, जोशीज रन बेबी रन यांसारख्या चित्रपटांतही तिने भूमिका निभावल्या होत्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

धक्कादायक! शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची आत्महत्या

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मनपातील प्रशासक काळातील लूट जनतेपर्यंत पोहचवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar संघटनेत नव्या जुन्यांनी एकत्र आले पाहिजे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागापर्यंत, जनतेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. मागील वेळेपेक्षा दोन जागा आपल्याला निश्चित जास्त...