Monday, November 25, 2024
Homeक्रीडाSA vs AFG : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय

SA vs AFG : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय

नवी दिल्ली | New Delhi

आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेमध्ये (ICC T20 World Cup ) आज गुरुवारी दक्षिण आफ्रिका विरूध्द अफगाणिस्तान (South Africa vs Afghanistan) संघामध्ये खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तान संघावर ९ गडी राखून दणदणीत विजय संपादन केला.या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने प्रथमच आयसीसीच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : राऊंड द विकेट : गर्वाचे घर खाली…

एडम मार्करमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने यंदाच्या हंगामात आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. तर उपांत्य फेरीत झालेल्या पराभवामुळे अफगाणिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानचा डाव ११.५ षटकांत ५६ धावांवर गुंडाळला. अफगाणिस्तान संघाकडून अष्टपैलू गुलबदीन नैबने ९, तर अझमतुलला ओमरझाई ने १० धावा केल्या.विशेष म्हणजे या सामन्यात अफगाणिस्तानला १३ अतिरिक्त धावा मिळाल्या.

हे देखील वाचा : IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज लढत; कुणाचे पारडे जड?

तसेच दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यानसेन आणि तबरेझ शम्सीने ३-३ गडी बाद केले. तर जलदगती गोलंदाज कगिसो रबाडा आणि एनरिक नॉकियाने २-२ गडी बाद केले.दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी आणि फिरकी गोलंदाजांनी मिळून अफगाणिस्तान संघाचा खेळ खल्लास केला. त्यानंतर या धावसंख्येचा पाठलाग करताना आफ्रिकेने ९ षटकांत हे लक्ष गाठले.

हे देखील वाचा : ‘जायंट किलर’ अफगाणिस्तान संघाला भारत रोखणार का?

दरम्यान, यावेळी लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अतिशय खराब झाली.सलामीवीर फलंदाज क्विंटन डिकॉक (Quinton Dikock) ५ धावा करून तंबूत परतला. मात्र कर्णधार एडम मार्करम आणि रिझा हेंड्रिक्स यांनी शांत आणि संयमी फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचा विजय सुकर केला. यानंतर मार्को यानसेन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या