Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशचांगली बातमी : मॉन्सून केरळमध्ये दाखल

चांगली बातमी : मॉन्सून केरळमध्ये दाखल

नवी दिल्ली

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी भारतीय हवामान विभागाने (IMD)दिली आहे. दोन दिवस उशिराने मान्सूनचे (Monsoon) केरळात (monsoon in kerala) आगमन झाले आहे. आता आठवड्याभरात मॉन्सून गोवा आणि तळकोकणात पोहचणार आहे.

- Advertisement -

सीरमला हवी Sputnik V लसींच्या उत्पादनाची परवानगी

अंदमान बेटांवर २१ मे रोजी मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर बंगालच्या उपसागरात ‘यास’ चक्रीवादळ तयार झाले. त्यामुळे मान्सूनला चाल मिळाल्याने गुरुवारी मान्सूनने श्रीलंकेसह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या काही भागांत वाटचाल केली.

हवामान खात्याने २७ मे रोजी ३१ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असे म्हटले होते, मात्र सर्वसामान्यपणे देशात १ जूनपर्यंत मान्सून दाखल होतो. मात्र नंतर मान्सून ३ जूनपर्यंत देशात दाखल होईल, असे हवामान खात्याने म्हटले होते. दरवर्षीप्रमाणे सामान्य मान्सून राहील असे सांगत जून ते सप्टेंबरमध्ये घेण्यात येणाऱ्या तांदूळ, मका तसेच इतर पिके नेहमीप्रमाणे घेऊ शकता, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

स्कायमेटने देशात मान्सून ३० मे रोजीपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. सर्वसामान्य गतीने मान्सून केरळकडे सरकत असून अंदमान-निकोबार द्वीपसमूहामध्ये मॉन्सून २१ मे रोजी दाखल झाला होता.२७ मे रोजी मान्सून मालदीवमध्ये दाखल झाला होता त्यावेळी मान्सून केरळपासून २०० किलोमीटर दूर होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या