Friday, April 25, 2025
Homeनगरसोयाबीन खरेदीसाठी एक महिन्याची मुदत मिळावी

सोयाबीन खरेदीसाठी एक महिन्याची मुदत मिळावी

खा. लंके यांची दिल्लीत मागणी, अन्यथा आंदोलन

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्यांची मुदत वाढ मिळावी, अन्यथा सोमवारी संसदेबाहेर आंदोलन करू असा इशारा खा. नीलेश लंके यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला. संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवी दिल्लीमध्ये असलेल्या खा. लंके यांनी विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गुरूवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार यांच्या निवसासस्थानाबाहेर खा. लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

- Advertisement -

यावेळी खा. लंके म्हणाले, सोयाबीन खरेदीसाठी शासनाच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अद्यापही अनेक शेतकर्‍यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ भेटलीच पाहिजे. यासंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहोत. शेतकर्‍यांकडील सोयाबीन खरेदीसाठी आठ दिवसांची मुदत वाढ देऊन काही होत नाही. किमान एक महिन्यांची मुदत वाढ द्यायला हवी. सोयाबीन खरेदी झाली नाही तर शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणावर नुकसान होणार आहे. व्यापार्‍यांना कवडीमोल भावाने सोयाबीन विकावे लागणार आहे.
शेतकरी सुखी राहीला तर देश सुखी राहणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पाठीशी, शेतकर्‍यांबरोबर राहिले पाहिजे अशी आमची भूमिका आहे.

मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल
जायकवाडी प्रकल्पाअंतर्गत पैठण, शेवगाव या भागातील मच्छिमार बांधवांचा प्रश्न आहे. दरवष या मच्छिमार बांधवांवर टांगती तलवार असते. इको सेंसेटिव्ह झोन असतानाही तिथे सौर प्रकल्प उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. हा प्रकल्प झाल्यास लाखो लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यासंदर्भातही संबंधित मंत्र्यांना मी भेटणार असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...