Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : सोयाबीन चोरी करणारी दुसरी टोळी जेरबंद

Crime News : सोयाबीन चोरी करणारी दुसरी टोळी जेरबंद

नाऊर |वार्ताहर| Naur

शेतकर्‍यांचे सोयाबीन चोरी (Soybeans Theft) करणारी आणखी एका टोळीला (Gang) श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकाने कारवाई करत जेरबंद (Arrested) केले आहे. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील नायगाव येथील गोरक्षनाथ भिमराज ढवळे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या 45 हजार रूपये किंमतीच्या 11 क्विंटलच्या सोयाबीनच्या (Soybeans) 15 गोण्या अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या होत्या. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त माहिती मिळाली की, हा गुन्हा नायगाव (Naygav) येथील सचिन जगन्नाथ मोरे याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची माहीती त्यांना मिळाली.

- Advertisement -

त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अमंलदार यांनी सापळा रचून सचिन जगन्नाथ मोरे (वय-30, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर) याला ताब्यात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने वरील गुन्हा केल्याचे कबुल करून साथीदाराचे नाव हरीदास अर्जुन निकम (वय 19), शुभम जालींदर मोरे (वय 19), तुषार अनिल सदाफुले (वय 23), विशाल अशोक गायकवाड (वय 21, सर्व रा. नायगाव, ता. श्रीरामपूर) असे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी त्वरीत उर्वरीत आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला व त्यांना ताब्यात घेतले. त्यांनीही एकत्र येऊन सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्यापैकी काही आरोपी हे फिर्यादीच्या घराशेजारी राहणारे असुन त्यांनी प्रथमतः साठविलेल्या सोयाबीनची पाहणी केली, नंतर रात्री उशीरा तुषार अनिल सदाफुले याच्या पिकअप वाहन घेऊन शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या सोयाबीनच्या गोण्या चोरुन नेलेबाबत सांगितले. सदर गुन्ह्यातील चोरीचा माल खरेदी करणार्‍या व्यापाराचा तपास पथक कसोशीने शोध घेत असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल परेश आगलावे हे करत आहेत.

YouTube video player

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर कार्यालयातील पो.स.ई. चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे, व मोबाईल सेलचे पो.हे.कॉ. संतोष दरेकर, पो.हे.कॉ सचिन धनाड, पो.ना.रामेश्वर वेताळ तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. अरुण धनवडे, पो.हे.कॉ. परेश आगलावे यांनी केली.

ताज्या बातम्या

Rahata : शिर्डीतील तरुणाला जिवंत जाळले, कुख्यात पोकळेसह टोळी जेरबंद

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण आणि निर्घृण खुनाची घटना उघडकीस आली आहे. राहाता परिसरातून बेपत्ता झालेल्या सचिन गिधे या तरुणाचा...