Friday, April 25, 2025
Homeनगरजिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पदोन्नती

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पदोन्नती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली. या पदोन्नतीमध्ये राज्यातील सुमारे 9 आयपीएस अधिकार्‍यांचा समावेश आहे. तसा आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने काढला काढला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला हे 2012 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सलग तेरा वर्षे सेवा बजावल्यानंतर आयपीएस अधिकार्‍यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती देण्यात येते.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यापूर्वी श्रीरामपूर, मालेगाव येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यकाळ गाजविला. नागपूर शहर पोलीस उपायुक्त, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक येथे कर्तव्य बजावले. सलग 13 वर्षे सेवा पूर्ण केल्याने त्यांची भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...