Friday, September 25, 2026
Homeनाशिकस्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत सुरगाणा शहरात विशेष स्वच्छता मोहीम

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत सुरगाणा शहरात विशेष स्वच्छता मोहीम

सुरगाणा | वार्ताहर
सुरगाणा नगरपंचायतीच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ व ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आज दि, २४ सप्टेंबर रोजी सुरगाणा शहरातील विविध भागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे व परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

या अभियानांतर्गत शहरातील स्वामी समर्थ मठ तसेच देवी पाडा, खोकर तळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सुरगाणा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष भरत आप्पा वाघमारे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसरातील साचलेला कचरा, घाण, अनावश्यक वस्तू व इतर कचरा हटवून परिसराची स्वच्छता केली. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत परिसर स्वच्छ व कचरामुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

- Advertisement -

घोटाळ्यातील तपासाची चक्रे अधिक तीव्र; आयडी मिळवणारे बनावट शिक्षक-कर्मचारी पोलिसांच्या रडारवर

स्वच्छता ही केवळ नगरपंचायतीची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरपंचायत कर्मचारी यांच्या सामूहिक सहभागातूनच शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवता येणार आहे. त्यामुळे स्वच्छता अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता नागरिकांनी दैनंदिन जीवनात स्वच्छतेची सवय अंगीकारावी, असा संदेश यावेळी श्री भरत वाघमारे यांनी दिला .

या मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छता, नागरिकांचा सहभाग आणि सार्वजनिक परिसराची निगा याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शहरातील विविध भागांमध्ये नियमितपणे स्वच्छता उपक्रम राबवून नागरिकांना स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी करून घेण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न असल्याचे सुरगाणा नगरपंचायत मुख्याधिकारी सुभाष जानोरे यांनी यावेळी सांगितले

या स्वच्छता मोहिमेस नगरसेवक श्री. भगवान आहेर, स्वच्छता मुकादम विजय गोयल, नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त सुरगाणा घडविण्यासाठी पुढील काळातही विविध स्वच्छता व जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

ताज्या बातम्या

ज्ञानेश

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा अल्टिमेटम; या तारखेपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन

0
नवी दिल्ली | New Delhiदिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने आता निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त...