Monday, July 22, 2024
Homeदेश विदेशPlane Accident : स्पाईस जेटचं विमान वीजेच्या खांबाला धडकलं, पाहा PHOTO

Plane Accident : स्पाईस जेटचं विमान वीजेच्या खांबाला धडकलं, पाहा PHOTO

दिल्ली | Delhi

- Advertisement -

स्पाईस जेट (Spicejet) कंपनीचं विमान एका वीजेच्या खांबाला (ight pole) धडकल्याचा प्रकार समोर आला आहे.

दिल्लीतील (Delhi Airport) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) हा अपघात झालाय.

आज सकाळी दिल्लीहून (Delhi) श्रीनगरला (Shrinagar) जाणारे स्पाईस जेट (SpiceJet flight) कंपनीचे बोइंग 737-800 (Spicejet 737-800) हे विमान उड्डाण घेण्यापूर्वी विजेच्या खांबाला धडकले.

विमानाचा एक पंख विमानतळावरील एक भव्य अशा विजेच्या खांबाला धडकला. यामुळे या विमानाचं मोठं नुकसान झालं आहे.

सुदैवानं ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळी विमानात कोणतेही प्रवासी नव्हते. या घटनेनंतर दुसऱ्या विमानाने प्रवाशांना पाठवण्यात आले.

दरम्यान या अपघाताची चौकशी सुरू असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या