Wednesday, January 7, 2026
Homeक्रीडाInd vs Aus 3rd ODI : भारताचा ऑस्ट्रेलियावर ९ गडी राखून विजय;...

Ind vs Aus 3rd ODI : भारताचा ऑस्ट्रेलियावर ९ गडी राखून विजय; रोहित शर्माची ‘हिट’ खेळी

सिडनी | Sydney

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यात शनिवारी सिडनी (Sydney) येथील मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात शुभमन गिलच्या (Shubhman Gill) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ९ गडी आणि ६९ चेंडू शिल्लक ठेवून दणदणीत पराभव केला. शेवटचा सामना जरी भारताने (India) जिंकला असला तरी ऑस्ट्रेलियाने ही मालिका २-१ अशा फरकाने खिशात घातली.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाने (Australia) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडने पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. दोघांनी सुरवातीला शांत आणि संयमी खेळ करत खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर आक्रमक खेळण्यास सुरुवात केली होती. पण ही भागिदारी फोडण्यात मोहम्मद सिराजला यश मिळाले. सिराजने हेडला २९ धावांवर बाद केले. हेडने एकदिवसीय सामन्यात ३००० धावांचा टप्पा पूर्ण केला. हेड तंबूत परतल्यानंतर अक्षर पटेलने कर्णधार मिचेल मार्शला ४१ धावांवर बाद केले आणि भारताला दुसरी विकेट मिळवून दिली. त्यानंतर काही वेळ ऑस्ट्रेलिया संघाची धावांची गती मंदावली.

YouTube video player

यानंतर मॅट रॅनशॉ आणि मॅथ्यू शॉर्टची भागीदारी रंगत आहे. असे वाटत असताना तेविसाव्या षटकांत वाॅशिंगटन सुंदरने मॅथ्यू शॉर्टला ३० धावांवर बाद केले. यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीने मॅट रॅनशॉसोबत अर्धशतकी भागीदारी रचून संघाला सावरले. हर्षित राणाने ही जोडी फोडली. अॅलेक्स कॅरी २४ धावा काढून बाद झाला. श्रेयस अय्यरने अप्रतिम झेल टिपला. मात्र झेल पकडण्याच्या नादात डाव्या बाजूला जोरात पडल्याने श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला आणि त्याला अर्धवट मैदान सोडावे लागले.

अॅलेक्स कॅरी बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ठराविक अंतराने आपले फलंदाज झटपट गमावले. मॅट रॅनशॉ ५६ धावा काढून तंबूत परतला.वाॅशिंगटन सुंदरने त्याला पायचीत केले. त्यानंतर लगेचच मायकेल ओव्हन १ धावा काढून बाद झाला. हर्षित राणाने त्याला बाद केले.कुलदीप यादव ने मिचेल स्टार्कला २ धावांवर बाद केले. नॅथन एलिसने कुपर कोनेलीला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र नॅथन एलिसला १६ धावांवर प्रसिद्ध कृष्णाने रोहित शर्माकडे झेलबाद केले.रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० झेल पूर्ण केले . तसेच हर्षित राणाने कुपर कोनेली २३ आणि जाॅश हेझलवूडला शून्यावर बाद केले.ऑस्ट्रेलिया संघाला ४६.४ षटकांत सर्वबाद २३६ धावा काढता आल्या. भारतीय संघाकडून हर्षित राणाने ४ वाॅशिंगटन सुंदर २ तसेच प्रसिद्ध कृष्णा कुलदीप यादव, अक्षर पटेल ने १-१ गडी टिपले.

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या भारताला कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचून चांगली सुरुवात करून दिली. शुभमन गिल २४ धावा काढून बाद झाला. जाॅश हेझलवूडने अॅलेक्स कॅरीकडे झेलबाद करत ही भागीदारी फोडली आणि ऑस्ट्रेलिया संघाला पहिले यश मिळवून दिले.विराट कोहलीने रोहित शर्मा सोबत १६८ धावांची भागीदारी रचून संघाची गाडी पुन्हा रुळावर आणली आणि संघाची धावसंख्या २३७ पर्यंत पोहोचवली.

दरम्यान, सलामीच्या दोन्ही सामन्यात शून्यावर माघारी परतणाऱ्या विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ७५ वे अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दीशतकी भागीदारी रचण्याची ही १२ वी वेळ ठरली.रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३३ वे शतक पूर्ण केले. तसेच रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ शतके ठोकली असून, ऑस्ट्रेलिया भूमीवर ६ शतके झळकावली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके पूर्ण केली आहेत.

ताज्या बातम्या

Crime News : बस स्थानकावर महिलेच्या पर्समधून 37 हजार लंपास

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील पुणे बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधील 37 हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली...